Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Baglamukhi Yantra Benefits Of Yantra

घरात ठेवा हे 1 यंत्र, दूर होईल दुर्भाग्य आणि मिळेल मनासारखे यश

रिलिजन डेस्क | Update - Jun 06, 2018, 11:47 AM IST

तंत्र शास्त्रामध्ये विविध मंत्र आणि यंत्राचा उपयोग केला जातो. हे यंत्र अत्यंत शक्तिशाली असतात.

 • Baglamukhi Yantra Benefits Of Yantra

  तंत्र शास्त्रामध्ये विविध मंत्र आणि यंत्राचा उपयोग केला जातो. हे यंत्र अत्यंत शक्तिशाली असतात. हे यंत्र सिद्ध करून मनासारखे यश प्राप्त केले जाऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या विशेष यंत्रामध्ये देवी-देवतांना प्रसन्न करण्याची तसेच ग्रहांना अनुकूल करण्याची शक्ती राहते.


  हे यंत्र तयार करण्यासाठी एक खास प्रकारचा कागद, कलम आणि शाही वापरली जाते. शुभ मुहूर्तावर तयार करण्यात आलेले यंत्र शुभ प्रभाव प्रदान करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एक बगलामुखी यंत्राविषयी सांगत आहोत. हे यंत्र तुम्हाला मनासारखे यश प्राप्त करून देऊ शकते.


  पुढील स्लाईडवर वाचा, यंत्र सिद्ध करण्याचा विधी आणि होणारे फायदे...

 • Baglamukhi Yantra Benefits Of Yantra

  यंत्र सिद्ध करण्याचा विधी आणि होणारे फायदे

  1. बगलामुखी यंत्र शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. हे यंत्र शुभ मुहूर्तावर स्थापित करून बगलामुखी मंत्राचा जप करावा.
  मंत्र-ऊं ह्लीं श्रीं ह्लीं पीताम्बरे तंत्र बाधाम नाशय नाशय


  2. मंत्र जप करताना पिवळे वस्त्र धारण करावे आणि जप करण्यासाठी हळकुंडाच्या माळेचा उपयोग करावा.


  3. हे यंत्र समोर ठेवून देवी बगलामुखी मंत्राचा जप केल्याने शत्रूने केलेली तंत्र-मंत्र क्रिया नष्ट होते आणि साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


  4. देवी बगलामुखीची कृपा ज्या व्यक्तीवर होते त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात.


  5. ज्या घरामध्ये बगलामुखी यंत्र असते, तेथे कोणत्याही प्रकारचा वास्तू, पितृ दोष राहत नाही.

Trending