Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | belief of footwear about Saturday related shani

शनिवारी चप्पल-बूट चोरी होणे का मानले जाते शुभ, काय आहे मान्यता?

रिलिजन डेस्क | Update - May 11, 2018, 02:13 PM IST

वैशाख मासातील अमावास्येला शनी जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 15 मे, मंगळवारी आहे

  • belief of footwear about Saturday related shani

    वैशाख मासातील अमावास्येला शनी जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 15 मे, मंगळवारी आहे. भारतीय समाजात शनिदेवाशी संबंधित विविध शकुन-अपशकुनांची मान्यता प्रचलित आहे. यामधील एक मान्यतेनुसार शनिवारी चप्पल-बूट चोरी झाल्यास हा शुभ संकेत समजावा. असे घडल्यास वाईट काळ दूर होणार असल्याचे समजावे. आज आम्ही तुम्हाला याच मान्यतेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत...


    शुभ संकेत समजावा
    उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार शनिवारी चप्पल-बूट चोरी झल्यास हा शुभ संकेत मानावा. चप्पल-बुटसोबत तुमच्या सर्व अडचणीही निघून गेल्या असे समजावे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला क्रूर आणि कठोर न्यायप्रिय ग्रह मानण्यात आले आहे. शनी अशुभ झाल्यास व्यक्तीला खूप प्रयत्न, कष्ट करूनही मनासारखे यश प्राप्त होत नाही. शनिवारचा दिवस शनीचा मानला जातो.


    आपल्या शरीराचे अंगही ग्रहाने प्रभावित असतात. त्वचा आणि पायामध्ये शनीचा वास मानण्यात आला आहे. यांच्याशी संबंधित गोष्टी शनीला दान केल्यास जातात आणि यांचे आजारही शनीशी संबंधित असतात. त्वचा आणि पाय दोन्हीही शनीने प्रभावित असतात, यामुळे चप्पल-बूट शनिवारी चोरी झाल्यास आपली साडेसाती निघून गेली असे समजावे. काही लोक याच कारणामुळे शनिवारी शनी मंदिरात चप्पल-बूट सोडून येतात.

Trending