Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Dhan Prapti che Upay In Marathi

ज्योतिषच्या 5 उपायांनी दूर होऊ शकतो वाईट काळ आणि दृष्ट, वाढू शकते इन्कम

रिलिजन डेस्क | Update - May 02, 2018, 11:41 AM IST

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास त्या व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

 • Dhan Prapti che Upay In Marathi

  एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास त्या व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रहांचे दोष किंवा दृष्ट लागली असेल तर व्यक्तीला कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि वाईट काळाला सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे तिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांनी सांगितलेले काही खास उपाय, ज्यामुळे तुमच्यावर वाईट शक्ती आणि दृष्टचा प्रभाव नष्ट होऊ शकतो.


  पहिला उपाय
  कामामध्ये येत असलेले अडथळे दूर करण्यासाठी 3 दिवस संध्याकाळी एक मूठभर बारीक केलेले मीठ घेऊन स्वतःवरून 3 वेळेस उतरवून घ्यावे. त्यानंतर हे मीठ दरवाजाबाहेर टाकून द्यावे. हा तंत्रचा उपाय आहे. यामुळे वाईट शक्ती, दृष्ट दूर होते.


  दूसरा उपाय
  प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला पितर देवतांसाठी धूप-दीप लावावा. सकाळी 5 गायींना फळ खाऊ घालावेत.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

 • Dhan Prapti che Upay In Marathi

  तिसरा उपाय
  घरावरील वाईट शक्तीचा प्रभाव दूर करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर घरामध्ये ऊँ नमः शिवाय मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


  चौथा उपाय 
  एखादा व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल तर सात प्रकारचे धान्य एक-एक मूठ घेऊन आजारी व्यक्तीवरून 7 वेळेस उतरवून घ्यावेत. त्यानंतर हे ध्यान पाण्यात उकळून घ्यावे. उकडलेल्या धान्यामध्ये थोडासा शेंदूर आणि 50 ग्रॅम तिळाचे तेल टाकावे. त्यानंतर दुपारी 12 वाजता भैरव मंदिरात हे धान्य अर्पण करावे. हा उपाय रविवारी केल्यास जास्त लाभ होईल. 


  पाचवा उपाय
  मंगळवारी हनुमानाच्या चरणावर एक नाणे अर्पण करावे. चरणावरील शेंदुराने टिळा लावावा. या उपायाने वाईट दृष्ट नष्ट होईल.

Trending