या 8 वस्तूंचे / या 8 वस्तूंचे दान केल्याने तुम्हाला फायदा नाही उलट होऊ शकते नुकसान

यूटिलिटी डेस्क

Mar 27,2018 02:55:00 PM IST

दान केल्याने व्यक्तिला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. परंतु अनेकवेळा मनुष्य चुकून अशा काही वस्तूंचे दान करतो, ज्या फायद्याऐवजी नुकसान पोहोचवणा-या असतात. पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या 8 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे काम बनू शकते. जाणुन घ्या या वस्तू कोणत्या आणि त्यांचे दान केल्यावर तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


जाणून घ्या, दानाचे महत्त्व...
दानाचा अर्थ आहे देणे. जी वस्तू स्वतःच्या इच्छेने इतरांना देऊन परत न घेणे याला दान म्हणतात. दानामध्ये अन्न, पाणी, धन-धान्य, गाय, बैल इ. गोष्टी दिल्या जातात. परंपरेमध्ये दानाला कर्तव्य आणि धर्म मानले जाते. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...


दानं दमो दया क्षान्ति: सर्वेषां धर्मसाधनम् ॥ (याज्ञवल्क्यस्मृति, गृहस्थ)
अर्थ : अन्नजलादी वस्तूंचे दान, मनाला निषिद्ध विषयांचे चिंतन करू न देणे, दीनदुबळ्यांवर दया करणे आणि एखाद्याने अपकार केला असताही चित्ताचा क्षोभ होऊ न देणे, ही धर्माची साधने आहेत.


धर्मग्रंथांमध्ये दानाचे चार प्रकार सांगण्यात आले आहेत.
नित्यदान - परोपकाराची भावना आणि कोणत्याही फळाची इच्छा न ठेवता हे दान केले जाते.
नैमित्तिक दान -आपल्या पापांच्या शांतीसाठी विद्वान ब्राह्मणांच्या हातावर हे दान ठेवले जाते.
काम्य दान - आपत्य, विजय, सुख-समृद्धी आणि स्वर्ग प्राप्तीच्या इच्छेने हे दान केले जाते.
विमल दान - जे दान ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केले जाते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 7 दानांविषयी सविस्तर माहिती...

X
COMMENT