आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये लाफिंग बुद्धा कुठे आणि कसा ठेवावा, वाचा कोणत्या कामासाठी कोणती मूर्ती खास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्याप्रकारे भारतामध्ये वास्तुशास्त्र आहे, त्याचप्रमाणे चीनमध्ये फेंगशुई शास्त्र आहे. भारतमध्ये कुबेराला धन देवता मानले जाते तर चीनमध्ये लाफिंग बुद्धाला. फेंगशुई मान्यतेनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात असल्यास सौभाग्य वाढते.


कोण होते लाफिंग बुद्धा....
महात्मा बुद्धांच्या अनेक शिष्यांमधील एक होते जपानचे होतेई. मान्यतेनुसार होतेई बौद्ध बनले आणि त्यानंतर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते मोठमोठ्याने हसू लागले. यानंतर त्यांच्या जीवनातील एकमेव उद्देश म्हणजे लोकांना हसवणे आणि सुखी करणे. होतेई ज्या-ज्या ठीकाणी जात होते तेथील लोकांना हसवत होते आणि लोकही त्यांच्यासोबत खूप आनंदी राहत होते. यामुळे जपानमध्ये लोक त्यांना हसणारा बुद्धा म्हणजेच लाफिंग बुद्धा म्हणू लागले. हळू-हळू त्यांच्या अनुयायांची संख्या वाढत गेली. एका देशातून दुसऱ्या देशात आणि आता संपूर्ण जगात त्यांना मानणारे कोट्यवधी लोक आहे. चीनमधील प्रचलित मान्यतेनुसार लाफिंग बुद्धा चिनी देवता आहेत. चीनमध्ये याना पूताई नावाने ओळखले जाते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...