Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Gomti Chakra Astrological Measures in marathi

5 उपाय : तिजोरी किंवा गल्ल्यात ही एक गोष्ट ठेवल्याने वाढू शकते इन्कम

रिलिजन डेस्क | Update - May 06, 2018, 11:39 AM IST

सध्याच्या धावपळीच्या जगात मनुष्याला दररोज कोणत्या न कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 • Gomti Chakra Astrological Measures in marathi

  सध्याच्या धावपळीच्या जगात मनुष्याला दररोज कोणत्या न कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु काही साधेसोपे उपाय करून या अडचणींमधून मुक्ती मिळवणे शक्य आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार तंत्र उपायांमध्ये विविध गोष्टींचा उपयोग केला जातो. यामधील एक गोष्ट म्हणजे गोमती चक्र. या विषयी फार कमी लोकांना माहिती असावे. गोमती चक्र कमी किंमत असलेला असा एक दगड आहे, जो गोमती नदीमध्ये आढळून येतो. विविध तंत्र उपायांमध्ये याचा उपयोग केला जातो. येथे जाणून घ्या, गोमती चक्राचे काही सोपे उपाय...


  1. गोमती चक्र तिजोरी आणि गल्ल्यात ठेवल्यास उत्पन्न वाढते. गोमती चक्र देवघरात देवी लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवून पूजा केल्यास धनलाभाचे योग जुळून येतात.
  2. एखाद्या लहान बाळाला वारंवार दृष्ट लागत असेल तर त्यावरून 11 गोमती चक्र उतरवून एखाद्या चौकामध्ये फुकून द्यावेत आणि मागे वळून न पाहता घर निघून यावे.
  3. वारंवार धनहानी होत असेल तर 11 गोमती चक्रावर हळद लावून हे पिवळ्या कपड्यात गुंडाळून संपूर्ण घरात फिरवावेत. त्यानंतर एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करावेत. यामुळे धनहानी होणार नाही.


  इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • Gomti Chakra Astrological Measures in marathi

  4. तुमचे लहान बाळ रात्री दचकून झोपेतून उठत असेल तर लाल कपड्यात गोमती चक्र बांधून टेक तावीज तयार करा. हे तावीज लहान मुलाच्या गळ्यात घालावे.
  5. शत्रूंची संख्या वाढली असेल तर जेवढ्या अक्षराचे शत्रूचे नाव आहे, तेःवढे गोमती चक्र घेऊन त्यावर शत्रूचे नाव लिहा. त्यानंतर हे चक्र जमिनीत पुरून टाका. शत्रूचा तुमच्यावर कोणताही प्रभाव राहणार नाही.

Trending