Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | home cleaning benefits in marathi

घरातील या गोष्टीमुळे वाढते गरिबी, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

रिलिजन डेस्क | Update - Jun 20, 2018, 12:02 AM IST

घरातील वृद्ध मंडळी वारंवार सांगत राहतात की, घरामध्ये जुने, व्यर्थ सामान ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा.

 • home cleaning benefits in marathi

  घरातील वृद्ध मंडळी वारंवार सांगत राहतात की, घरामध्ये जुने, व्यर्थ सामान ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण आहेत. घरामध्ये निरुपोयगी सामान ठेवल्याने अस्वच्छता वाढते, कारण ज्या ठिकाणी जुने सामान ठेवलेले असते तेथे नियमित साफ-सफाई होत नाही आणि अस्वच्छता वाढत जाते. यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते.


  पुढील स्लाईड्सवर वाचा या प्रथेमागचे धार्मिक कारण...

 • home cleaning benefits in marathi

  ज्या ठिकाणी जास्त व्यर्थ आणि जुने सामान असते तेथे दरिद्रता निवास करते आणि अशा घरातून लक्ष्मी निघून जाते. मान्यतेनुसार देवी लक्ष्मी स्वच्छता असलेल्या ठिकाणची निवास करते. याउलट अस्वच्छ ठिकाणी गरिबी पाय पसरवू लागते. यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. घराचे उत्पन्न वाढत नाही.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ज्योतिषीय कारण...

 • home cleaning benefits in marathi

  ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये जुने सामान ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि त्यांचे विचारही निगेटिव्ह बनतात. ज्योतिषीय मान्यतेनुसार घरात व्यर्थ सामान ठेवल्यास राहू-केतूशी संबंधित दोष लागतात. यामुळे आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते.

Trending