Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Importance Of Going To Temple

मंदिरात जाण्यासाठी वेळ नसल्यास, फक्त करा हे एक काम, होतील 3 फायदे

रिलिजन डेस्क | Update - Apr 30, 2018, 05:27 PM IST

हिंदू धर्मामध्ये मंदिरात जाण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी लोक

 • Importance Of Going To Temple

  हिंदू धर्मामध्ये मंदिरात जाण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी लोक आपल्या दिवसाची सुरुवात मंदिरात गेल्यानंतरच करत होते परंतु सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांना मंदिरात जाणे शक्य होत नाही. वेळेच्या अभावामुळे काही लोकं इच्छा असूनही मंदिरात जाता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मंदिराच्या फक्त कळसाचे (शिखर) दर्शन घेतले तरी पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते.


  उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, ग्रंथामध्ये लिहिले आहे की, शिखर दर्शनम् पाप नाशम्। म्हणजेच कोणत्याही मंदिराच्या शिखराचे दर्शन केल्याने पापांचा नाश होतो. यामुळे जेव्हाही एखादे मंदिर दिसले तेव्हा कमीत कमी कळसाचे दर्शन अवश्य घ्यावे. शास्त्रानुसार केवळ कळसाचे दर्शन घेतल्याने पापातून मुक्ती मिळते.


  मंदिराचा कळसाचेही तेवढेच महत्त्व आहे जेवढे मंदिरातील मूर्तीचे आहे. कळसाचे दर्शन घेतल्याने आपले सर्व पाप नष्ट होतात. यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे कळसाचे दर्शन घेताना आपल्या कुलदैवतेचे स्मरण करावे. यामुळे जास्त लाभ होतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कळसाचे दर्शन घेतल्याने कोणते तीन खास लाभ होतात...

 • Importance Of Going To Temple

  कळसाचे दर्शन घेण्याचे फायदे
  1. मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते.
  2. सर्व पाप नष्ट होतात.
  3. जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

Trending