कोण चालवतो सूर्यदेवाचा / कोण चालवतो सूर्यदेवाचा रथ, कोणत्या धर्म ग्रंथाला मानले जाते पाचवा वेद?

May 01,2018 02:10:00 PM IST

हिंदू धर्म साहित्य खूपच विस्तृत आहे. या अंतर्गत अनेक पुराण, वेद, धर्म ग्रंथ, उपनिषद इ. येतात. या सर्व ग्रंथांमध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला माहित नसतील. आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्म ग्रंथाशी संबंधित काही रोचक प्रश्नांची उत्तरे सांगत आहोत...


धर्म ग्रंथानुसार सूर्यदेवाच्या सारथीचे नाव काय आहे?
उत्तर -
सूर्यदेवाचा रथ चालवणाऱ्या सारथीचे नाव अरुण आहे. यांच्या आईचे नाव विनिता आणि वडिलांचे महर्षी कश्यप आहे. भगवान विष्णूचे वाहन गरुड हे अरुणचे छोटे भाऊ आहेत. धर्म ग्रंथानुसार अरुण देवाला दोन आपत्य होती, जटायू आणि संपाती. जटायूने देवी सीतेचे हरण करणाऱ्या रावणासोबत युद्ध केले होते आणि संपातीने वानरांना लंकेचा मार्ग दाखवला होता.


हिंदू धर्मामध्ये कोणत्या ग्रंथाला पाचव्या वेदाचे स्थान देण्यात आले आहे?
उत्तर-
हिंदू धर्मामध्ये महाभारताला पाचवा वेद म्हटले जाते. याचे रचनाकार महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास आहेत. महर्षी वेदव्यासांनी या ग्रंथासंदर्भात स्वतः सांगितले आहे की - यन्नेहास्ति न कुत्रचित् | अर्थ - ज्या विषयाची चर्चा या ग्रंथामध्ये केली गेली नसेल, त्या विषयाची चर्चा अन्यत्र (इतर कोणत्याही ठिकाणी) उपलब्ध नाही. श्रीमद्भागवतगीता यासारखे अमुल्य रत्न या महासागराची देन आहे. या ग्रंथामध्ये एकूण एक लाख श्लोक आहेत, यामुळे याला शतसाहस्त्री संहिता असेही म्हटले जाते.

पुराणांमध्ये वर्णीत अश्वमेध यज्ञ काय आहे? उत्तर - धर्म ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी अश्वमेध यज्ञाचे वर्णन मिळते. वाल्मिकी रामायणानुसार श्रीराम व महाभारतानुसार युधिष्ठीरने हा यज्ञ केला होता. या यज्ञाच्या अंतर्गत एक घोडा सोडला जात असे. हा घोडा ज्या ठिकाणापर्यंत जात असे, त्या ठिकाणापर्यंतची सर्व भूमी (जमीन) यज्ञ करणाऱ्या व्यक्तीची मानली जात असे. जर एखाद्या व्यक्तीने याचा विरोध केला तर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला त्यासोबत युद्ध करावे लागत होते. हा यज्ञ ग्रीष्म किंवा वसंत ऋतूमध्ये केला जाते असे आणि जवळपास एक वर्ष याच्या सुरवातीचे अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी लागत होते.
X