Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | limbu mirachi lavnyache dharmik aani vaidnyanik karan

जाणून घ्या, घर-दुकानाच्या बाहेर लिंबू-मिरची लावण्यामागचे सत्य

रिलिजन डेस्क | Update - Jun 05, 2018, 02:49 PM IST

भारत हा संस्कृती आणि परंपरांचा देश आहे. या देशाने जगाला भलेही खूप वैज्ञानिक दिले असतील परंतु येथे अजूनही वैज्ञानिक तथ्या

 • limbu mirachi lavnyache dharmik aani vaidnyanik karan

  भारत हा संस्कृती आणि परंपरांचा देश आहे. या देशाने जगाला भलेही खूप वैज्ञानिक दिले असतील परंतु येथे अजूनही वैज्ञानिक तथ्यापेक्षा जास्त अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जातो. लोक स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अंधश्रद्धेशी संबंधित प्रत्येक अशी गोष्ट मान्य करतात, ज्यामध्ये त्यांना स्वतःचा फायदा दिसतो. या सर्व गोष्टी शुभ किंवा अशुभ मानून त्या नियमनाचे पालन करतात. भारतामध्ये लिंबू-मिरची एका दोऱ्यात बांधून घर, दुकान आणि ऑफिसच्या बाहेर एवढेच नाही तर ट्रक, रिक्षा गाडीमध्ये लटकावून ठेवणे एक सामान्य प्रथा आहे. यामागे पौराणिक कारण तर आहेच याच बरोबर अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक कारणही आहे. येथे जाणून घ्या, या प्रथेमागचे पौराणिक, वैज्ञानिक आणि अंधश्रद्धेचे कारण...


  पौराणिक - धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की, दुर्भाग्याची देवी अलक्ष्मीला आंबट, खारट, तिखट आणि मसालेदार जेवण अत्यंत प्रिय आहे. यामुळे अलक्ष्मीला जेथे आपले प्रिय भोजन दिसते ते खाऊन ती बाहेरूनच निघून जाते.


  पुढील स्लाईडवर वाचा, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक कारण...

 • limbu mirachi lavnyache dharmik aani vaidnyanik karan

  अंधश्रद्धा : प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या घर, दुकान, ऑफिस आणि गाडीच्या बाहेर लिंबू-मिरची अवश्य लावतो. कारण यामुळे कोणीही त्याच्या घर, दुकान आणि गाडीकडे जास्त वेळ पाहू नये आणि एखाद्याने खुप वेळ पाहिल्यास त्याचे मन लिंबू-मिरचीप्रमाणे आंबट आणि तिखट होईल आणि वाईट दृष्टीचा प्रभाव बाहेरच राहील. असा काहीसा विचार करूनच लोक घर-दुकानाबाहेर लिंबू-मिरची लटकावून ठेवतात.


  पुढील स्लाईडवर वाचा, वैज्ञानिक कारण...

 • limbu mirachi lavnyache dharmik aani vaidnyanik karan

  वैज्ञानिक : लिंबू आणि मिरचीमध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. हे ऍसिड बाहेरील बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करते आणि जिवाणूंपासून दूर राहून आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे मदत करते. यामुळे जुने लोक घराबाहेर  लिंबू आणि मिरची लटकावून ठेवत होते. परंतु आजच्या काळात वाईट दृष्टीपासून रक्षण करणारे हे एक यंत्र मानले गेले आहे.

Trending