आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमानाची पूजा करताना लक्षात ठेवा या 12 गोष्टी, दुर्भाग्य होऊ शकते दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलियुगात श्रीरामाचे अनन्य भक्त बजरंगबली भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुखी आणि समृद्धशाली बनवतात. याच कारणामुळे यांच्या भक्तांची संख्या सर्वात जास्त आहे. मंगळावर आणि शनिवारी हनुमान मंदिरात भक्तांची खूप गर्दी राहते. यांच्या पूजेने वाईट काळ दूर होतो. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार शास्त्रामध्ये हनुमान पूजा किंवा दर्शन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक सांगितले आहेत. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे नियम...


1. हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे. यामुळे भक्तांनी यांना तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
2. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचा पाठ करणे श्रेष्ठ उपाय आहे.
3. दुपारच्या वेळी बजरंगबलीला गूळ, तूप, गव्हाच्या पोळीचा चुरमा अर्पण करू शकता.
4. सकाळच्या वेळी हनुमानाला प्रसाद स्वरूपात गूळ, नारळ, लाडू अर्पण करावेत.
5. संध्याकाळी हनुमानाला फळांचा उदा. केली, पेरू, सफरचंदचा नैवेद्य दाखवावा.
6. बजरंगबलीचा शृंगार किंवा वस्त्र अर्पण करताना तिळाच्या किंवा चमेलीच्या तेलामध्ये मिसळेलंलं शेंदूर लावावा.
7. हनुमानाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे फुल विशेष प्रिय आहे. या फुलांमध्ये कमळ, झेंडू, गुलाब यांचे विशेष महत्त्व आहे.
8. श्रीरामाचे अनन्य भक्त बजरंगबलीची कृपा प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचर्यचे पालन आवश्यक आहे.
9. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद इतर भक्तांमध्ये वाटावा आणि स्वतःही ग्रहण करावा.
10. आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची विशेष पूजा करावी. या दिवसांमध्ये बजरंगबलीची विशेष कृपा प्राप्त होते.
11. हनुमान पूजेमध्ये शुद्धता आणि पावित्र्याकडे विशेष द्यावे.
12. हनुमानाला केशर आणि लाल चंदनाचा टिळा अवश्य लावावा.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...