Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Measures Of Mustard

लग्नाच्या वेळी वर-वधूच्या रुमालात बांधा मोहरीचे दाणे, लागणार नाही दृष्ट

रिलिजन डेस्क | Update - Jun 10, 2018, 11:35 AM IST

मोहरी प्रत्येक स्वयंपाकघरात असते. याचा उपयोग मसाला रूपात केला जातो. काही ज्योतिष उपायांमध्येही मोहरी वापरली जाते.

 • Measures Of Mustard

  मोहरी प्रत्येक स्वयंपाकघरात असते. याचा उपयोग मसाला रूपात केला जातो. काही ज्योतिष उपायांमध्येही मोहरी वापरली जाते. तंत्र शास्त्रामध्येही मोहरीचे खास महत्त्व सांगण्यात आले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार मोहरी शनीशी संबंधित आहे. येथे जाणून घ्या, मोहरीचे काही खास उपाय...


  1. एखाद्या व्यक्तीला वाईट दृष्ट लागली असेल तर हातामध्ये मोहरी आणि खडेमीठ घेऊन व्यक्तीवरून 7 वेळेस उतरवून घ्यावे आणि एखाद्या चौकात मोहरी-खडेमीठ फेकून द्यावे. हे काम रात्री करावे आणि घरात जाण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावेत.


  2. लग्नाच्या वेळी वर-वधूच्या रुमालात थोडीशी मोहरी बांधल्याने निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव त्यांच्यावर पडणार नाही.


  3. एखाद्या व्यक्तीवर वाईट शक्तीचा प्रभाव असल्यास मोहरी हातामध्ये घेऊन दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून 11 वेळेस उतरवून जाळून टाकावी. यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • Measures Of Mustard

  4. थोडीशी पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन संपूर्ण दुकानात फिरावे आणि नंतर नदीमधील मोहरी प्रवाहित करावी. यामुळे दुकानाला लागलेली दृष्ट नष्ट होऊन बिझनेस पुन्हा चालू लागेल.


  5. साडेसातीमुळे त्रस्त असाल तर शनिवारी 3 चिमूटभर मोहरी स्वतःवरून 11 वेळेस उतरवून काळ्या कपड्यात बांधून जाळून टाकावी. यामुळे शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते.

Trending