Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Moti Shankh che Upay in marathi

हा उपाय केल्यानंतर तिजोरीत ठेवा हा शंख, दूर होईल पैशांची तंगी

रिलिजन डेस्क | Update - Apr 25, 2018, 10:01 AM IST

काही लोकांकडे पैसा असतो परंतु तो टिकून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरी पैसा येताच संपून जातो.

 • Moti Shankh che Upay in marathi

  काही लोकांकडे पैसा असतो परंतु तो टिकून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरी पैसा येताच संपून जातो. अशा लोकांच्या घरामध्ये बरकत राहत नाही आणि नेहमी आर्थिक तंगी राहते. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर मोती शंखाच्या माध्यमातून यामधून मार्ग काढणे शक्य आहे. येथे जाणून घ्या, हा खास उपाय.


  काय आहे मोती शंख
  उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार मोती शंख एक विशेष प्रकारचा शंख असतो. हा सामान्य शंखापेक्षा थोडासा वेगळा दिसतो आणि चमकदार असतो. या शंखाची विधिव्रत पूजा करून तिजोरीत ठेवल्यास पैसा टिकू लागतो आणि उत्पन्न वाढते.


  हा आहे उपाय...
  एखाद्या बुधवारी सकाळची स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर स्वच्छ कपड्यावर हा शंख ठेवून त्यावर केशर स्वस्तिक चिन्ह काढावे. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा.


  श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:


  2. या मंत्राचा जप स्फटिकाच्या माळेनेच करावा. मंत्रोच्चारासोबत एक-एक तांदूळ या शंखामध्ये टाकावा. तांदूळ अखंड असावेत. हा प्रयोग सलग 21 दिवस करावा.


  उर्वरित उपाय पुढील स्लाईडवर वाचावा...

 • Moti Shankh che Upay in marathi

  अशाप्रकारे रोज एक माळ जप करावा. त्यानंतर शंखातील सर्व तांदूळ आणि शंख एका कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला सकारात्मक प्रभाव दिऊन येतील. घरामध्ये धन-धान्य राहील आणि पैसा येईल.

Trending