Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Old Traditions About Funeral antya sanskar

प्रथा : अंत्यसंस्कारात शवाच्या मुखावर ठेवली जाते ही 1 खास गोष्ट

रिलिजन डेस्क | Update - Jun 23, 2018, 02:30 PM IST

श्रीमद् भागवत गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले शरीर नश्वर आणि आत्मा अमर असल्याचे सांगितले होते.

 • Old Traditions About Funeral antya sanskar

  श्रीमद् भागवत गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले शरीर नश्वर आणि आत्मा अमर असल्याचे सांगितले होते. आत्मा निश्चित वेळेसाठी शरीर धारण करतो आणि आत्म्याने शरीर सोडल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो. मृत्यूनंतर शवचा अंत्यसंस्कार केला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अंत्यसंस्काराच्या वेळी शवाच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवणे आवश्यक आहे. जाणून घ्या, या प्रथेशी संबंधित खास गोष्टी...


  1. हिंदू परंपरेमध्ये मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करताना त्याच्या मुखावर चंदन ठेवून दाह संस्कार केला जातो. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या प्रथेमागे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. चंदनाचे लाकूड थंड (शीतल) असते.


  2. प्राचीन काळी अंत्यसंस्कार चंदनाच्या लाकडामध्येच केले जात होते, परंतु आता चंदनाचे वाकून खूप महाग झाले आहे. सर्वांसाठी चंदनाचे वाकून उपलब्ध करणेही अवघड आहे. अशा स्थितीमध्ये सामान्य लाकडाने शवदाह केला जातो आणि चंदनाचे लाकूड तोंडावर ठेवले जाते. अशाप्रकारे चंदनाच्या लाकडाने अंत्यसंस्कारच्या प्रथेचे पालन केले जाते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अंत्यसंस्काराशी संबंधित इतर गोष्टी...

 • Old Traditions About Funeral antya sanskar

  3. चंदनाच्या थंड गुणधर्मामुळे शिवलिंगावर चंदन लावले जाते. चंदन लावल्याने आपल्या मस्तकाला थंडावा मिळतो.


  4. प्राचीन मान्यतेनुसार शवाच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवून अंत्यसंस्कार केल्याने व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. मृतकाला यमलोकातही चंदनाप्रमाणे शीतलता मिळते.

 • Old Traditions About Funeral antya sanskar

  5. वैज्ञानिक कारण असे आहे की, मृतकाचे अंत्यसंस्कार करताना मांस आणि हाडे जळताना उग्र गंध (वास) पसरतो. अशा स्थितीमध्ये चंदनाचे लाकूड जाळल्यामुळे या उग्र वासाचा प्रभाव कमी होतो.

Trending