Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Old Traditions About morning and Happiness

स्त्री असो वा पुरुष सकाळी उठताच चुकूनही पाहू नयेत या 2 गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Jun 07, 2018, 10:34 AM IST

प्राचीन मान्यतेनुसार सकाळची सुरुवात शुभ झाल्यास संपूर्ण दिवस शुभ राहतो. परंतु सकाळी काही अशुभ काम केल्यास याचा

 • Old Traditions About morning and Happiness

  प्राचीन मान्यतेनुसार सकाळची सुरुवात शुभ झाल्यास संपूर्ण दिवस शुभ राहतो. परंतु सकाळी काही अशुभ काम केल्यास याचा अशुभ प्रभाव दिवसभर आपल्यावर राहतो. दिवसाच्या सुरुवातील कोणतेही अशुभ काम घडू नये यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सकाळी उठताच कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...


  # झोपेतून उठताच आरशात चेहरा पाहू नये
  > बहुतांश लोक सकाळी झोपेतून उठताच सर्वात पहिले आरशात स्वतःचा चेहरा पाहतात. शास्त्रानुसार हे चुकीचे काम आहे. तुम्हाला तुमचा दिवस शुभ जावा असे वाटत असेल तर सकाळी उठल्यानंतर आरसा पाहण्याची चूक करू नका. हा अपशकुन मानला जातो.


  > वास्तुनुसारसुद्धा हे चूक आहे. यामुळे बेडरूममध्ये आरसा लावण्यास मनाई आहे. सकाळी आरसा पाहिल्याने रात्रभराची नकारात्मकता मिरर आपल्याकडे रिफ्लेक्ट करतो. यामुळे आपले विचार नकारात्मक बनतात.


  > दिवसभर कामामध्ये निगेटिव्ह विचार मनात येतात. यापासून दूर राहण्यासाठी सकाळी आरसा पाहू नये.


  > सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर आरसा पाहावा.


  पुढील स्लाईडवर वाचा, इतर कोणत्या वस्तू सकाळी पाहू नयेत आणि काय पाहावे...

 • Old Traditions About morning and Happiness

  # नकारात्मक फोटो पाहू नयेत
  > सकाळी उठताच हिंसा प्राण्यांचे किंवा कोणतेही नकारात्मक फोटो पाहू नयेत. काही लोक बुडणाऱ्या जहाजाचा फोटो घरामध्ये लावतात, हा फोटो सकाळी-सकाळी पाहू नये.


  > सकाळी-सकाळी नकारात्मक फोटो पाहिल्याने आपले विचार नकारात्मक होतात. संपूर्ण दिवसभर नकारात्मकता राहते.


  > अनेक लोक सकाळी उठताच मोबाइल पाहतात. अनेकवेळा मोबाइलमध्ये नकारात्मक मॅसेज किंवा फोटो येतात आणि यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. यामुळे दिवस सकारात्मक करण्यासाठी सकाळी उठताच मोबाइल पाहू नये.

 • Old Traditions About morning and Happiness

  # सकाळी उठल्यानंतर पाहाव्यात शुभ वस्तू 
  > सकाळी उठल्यानंतर शुभ वस्तू पाहाव्यात. डोळे उघडताच सर्वात पहिले स्वतःच्या तळहाताचे दर्शन घयावे. देवी-देवतांचे फोटो किंवा इतर सुंदर सकारात्मक फोटो पाहावेत.


  > या गोष्टीकडे लक्ष दिल्यास दिवसभर सकारात्मकता कायम राहते. सकाळी हाताकडे पाहताना खालील मंत्राचा जप करावा.


  मंत्र - कराग्रे वसति लक्ष्मीः, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंद:, प्रभाते कर दर्शनम्।


  या मंत्राचा उच्चार करत तळहाताचे दर्शन घेतल्याने महालक्ष्मी, भगवान विष्णू आणि देवी सरस्वतीची कृपा प्राप्त होऊ शकते.

Trending