या गोष्टींकडे लक्ष / या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर मिठामुळे वाढू शकते तुमची गरिबी

Apr 03,2018 12:30:00 PM IST

जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण बेचव लागते. मीठ केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर याच्या उपायाने दुर्भाग्यही दूर केले जाऊ शकते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योर्तिविद पं. सुनील नागरनुसार मिठाशी संबंधीत काही खास गोष्टींकडे लक्ष न दिल्यास गरिबीचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, मिठाशी संबंधित काही उपाय आणि प्राचीन मान्यता.


मिठाशी संबंधित मान्यता...
- एखाद्या गरजू व्यक्तीला मिठाचे दान केल्याने वाईट काळ दूर होतो आणि उत्तम जेवण प्राप्त होते.
- लक्षात ठेवा, कधीही मीठ दान स्वरूपात घेऊ नये. याचे दान केवळ गरजू लोक, पुरोहित (पूजा सांगणारे) घेऊ शकतात. इतर लोकांनी हे दान घेऊ नये.
- मिठाचा अपव्यय करू नये. यासोबतच सूर्यास्तानंतर घरातून कोणालाही मीठ देऊ नये.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मिठाचे काही खास उपाय...

X