Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Remember these 12 rules of Sleeping

12 गोष्टी : झोपताना अवश्य लक्षात ठेवा, कपाळावर टिळा लावून झोपू नये

रिलिजन डेस्क | Update - May 09, 2018, 01:52 PM IST

प्रत्येक व्यक्तीसाठी जेवणाएवढीच झोपही महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे जेवण केल्याशिवाय शरीर काम

 • Remember these 12 rules of Sleeping

  प्रत्येक व्यक्तीसाठी जेवणाएवढीच झोपही महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे जेवण केल्याशिवाय शरीर काम करत नाही ठीक त्याचप्रमाणे वेळेवर झोप न घेतल्यास विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे आयुर्वेदामध्ये प्रत्येकाला पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या धर्म ग्रंथांमध्येही झोपण्याशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, झोपण्याशी संबंधित काही खास नियम...


  1. ग्रंथांमध्ये ललाट म्हणजेच कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ मानण्यात आले आहे. (यामुळे रात्री झोपताना टिळा पुसून झोपावे)
  2. आयुर्वेदानुसार, डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
  3. उजव्या कुशीवर झोपल्याने आरोग्याशी संबंधित नुकसान होऊ शकते. यामुळे असे करू नये.
  4. सरळ झोपल्याने पाठीच्या हाडाचे नुकसान आणि पालथे झोपल्याने डोळे खराब होऊ शकतात.
  5. पूर्व दिशेला डोके करून झोपल्यास विद्या प्राप्ती होते.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, झोपण्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

 • Remember these 12 rules of Sleeping

  6. दक्षिण दिशेकडे डोके करून झोपल्यास धनलाभ तसेच आरोग्याशी संबंधित फायदा होतो.
  7. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास अडचणी वाढतात.।
  8. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास हानी होते.
  9. सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही झोपू नये.
  10. पलंगावर बसल्या-बसल्या झोपू नये. 
  11. घराच्या उंबऱ्यावर डोके ठेवून कधीही झोपू नये.
  12. सूर्यास्ताच्या एक प्रहर (जवळपास 3 तास) नंतरच झोपावे.

Trending