Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Shani jayanti 2018 measures for increases business

शनी जयंती : या उपायांनी बिझनेसमध्ये होऊ शकतो फायदा, वाढेल इन्कम

रिलिजन डेस्क | Update - May 15, 2018, 12:02 AM IST

वैशाख मासातील अमावस्या तिथीला शनी जयंती साजरी केली जाते. या वर्षी 15 मे, मंगळवारी हा उत्सव साजरा करेल जाईल.

 • Shani jayanti 2018 measures for increases business

  वैशाख मासातील अमावस्या तिथीला शनी जयंती साजरी केली जाते. या वर्षी 15 मे, मंगळवारी हा उत्सव साजरा करेल जाईल. ज्या व्यक्तीला शनीची कृपा प्राप्त होते, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख दूर होतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

  शनी जयंतीच्या निमित्ताने व्यापाऱ्यांनी या काळात कोणते उपाय केल्यास त्यांना लाभ होऊ शकतो, या संदर्भातील खास उपाय वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले आहेत. हे उपाय केल्यास व्यापाऱ्यांना व्यवसायात धन लाभासोबतच यश प्राप्त होऊ शकते. साडेसाती असलेल्या जातकांसाठीसुद्धा हे उपाय प्रभावी ठरतील.

  1. शमी वृक्षाला दूध, साखर, पाणी अर्पण करावे. व्यवसायातील अडथळे दूर होतील.

  2. मोहरीच्या तेलामध्ये तीळ टाकून गरजू व्यक्तीस दान करावेत. लाभ होईल.

  3. काळे उडीद, तीळ व खडेमीठ दान करावे. शनिदेवाची कृपा प्राप्त होईल.

  4. काळ्या चामड्याचे जोडे (चप्पल,बूट ) दान करावेत. साडेसातीचा प्रभाव कमी होईल.

  5. कस्तुरी व केशर शनी मंदिरात दान करावे. व्यवसायात मोठे सौदे होऊ शकतात.

  6. हनुमान मंदिरात शेंदूर आणि चमेली तेल अर्पण करावे. शत्रू पराभूत होतील.

  7. तीळ व साखरेचे लाडू गरीब लोकांना दान करावेत. व्यापारात दिवसेंदिवस वाढ होईल.

  8. नारळाला काळा बुक्का लावुन शनी समोर अर्पण करावे. व्यवसायाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही.

  9. काळे उडीद, काळे तीळ, तिळाचे तेल व मीठ ब्राम्हणास दान द्यावे. लाभ होईल.

  10. लोखंडी पात्रामध्ये तिळाचे तेल टाकून स्वतःचा चेहरा पाहून हे तेल दान करावे.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

Trending