शनी जयंती 15 / शनी जयंती 15 मे रोजी : या एक उपायाने शनिदोषातून मिळेल मुक्ती

रिलिजन डेस्क

May 09,2018 02:38:00 PM IST

या वर्षी 15 मे, मंगळवारी शनी जयंती आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात आलेले उपाय प्रभावशाली ठरतात. असाच एक प्राचीन आणि रामबाण उपाय म्हणजे शनी पाताळ क्रिया. हा उपाय केल्यास शनीच्या वक्रदृष्टीपासून रक्षण होऊ शकते. शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दुर्लभ संधीचा तुम्हीही लाभ घेऊ शकता.


उपाय -
शनी जयंतीपूर्वी कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शनिवारी शनिदेवाची लोखंडाची मूर्ती तयार करून घ्या. त्यानंतर शनिवारी या मूर्तीची विधीपूर्वक पूजा आणि प्राणप्रतिष्ठा करा. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा यथाशक्ती जप करा.


मंत्र
ऊं शं न देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये। शं योरभि स्त्रवन्तुन:।।


- त्यानंतर दशांश हवन करून अशा ठिकाणी एक खड्डा खोदा जेथून तुम्ही कधीही निघून जाणार नाहीत. या खड्यात शनिदेवाची मूर्ती उलटी ठेवा म्हणजे शनिदेवाचे मुख पाताळाकडे करा.


- त्यानंतर खड्यावर माती टाकून जागा समतळ करा आणि शनिदेवाकडे जीवनातील सर्व दुःख दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करा. हा उपाय विश्वासाने, श्रद्धेने केल्यास शनिदोषातून कायमस्वरूपी मुक्ती मिळणे शक्य आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

X
COMMENT