मंगळवारी करा हे / मंगळवारी करा हे उपाय : साडेसाती आणि ढय्याचा अशुभ प्रभाव होईल कमी

रिलिजन डेस्क

May 13,2018 11:44:00 AM IST

या वर्षी 15 मे, मंगळवारी शनी जयंती आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार सध्या वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. यासोबतच वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास यांच्या अडचणी कमी होऊ शकतात. इतर राशीच्या लोकांनीही हे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते...

शनी जयंतीच्या दिवशी सव्वा-सव्वा किलो काळे हरभरे वेगवेगळ्या तीन भांड्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर स्नान करून शनिदेवाची पूजा करा. भिजवलेले हरभरे मोहरीच्या तेलामध्ये तळून याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर पहिले सव्वा किलो हरभरे काळ्या म्हशीला खाऊ घाला. दुसरे सव्वा किलो हरभरे कुष्ठ रुग्णांना वाटून टाका. तिसरे सव्वा किलो हरभरे स्वतःवरून उतरून घ्या आणि एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी ठेवून घरी या. या उपायने शनिदेवाच अशुभ प्रभाव लवकर कमी होऊ लागेल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, दुसरा उपाय...

शनी जयंतीच्या दिवशी घरामध्ये शनि यंत्राची स्थापना करून पूजा करा. त्यानंतर दररोज नियमितपणे या यंत्राची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. दररोज या यंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. निळे किंवा काळे फुल अर्पण केल्यास लाभ होईल.

X
COMMENT