Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Shukrawar che Upay in marathi

आठवड्यातून एकदा करा नारळाचा हा उपाय, दूर होईल दुर्भाग्य

યૂટિલિટી ડેસ્કઃ | Update - Apr 20, 2018, 12:01 AM IST

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती शुभ नसल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

 • Shukrawar che Upay in marathi

  ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती शुभ नसल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. परंतु काही ज्योतिषीय उपाय करून ग्रहांचे दोष कमी केले जाऊ शकतात. येथे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, धन संबंधित समस्या दूर करणारा एक खास उपाय. हा उपाय शुक्रवारी महालक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर करावा.


  या विधीनुसार करावा उपाय...
  प्रत्येक शुक्रवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर श्रीगणेश आणि धनाची देवी महालक्ष्मीची पूजा करावी. पूजेमध्ये एक नारळही ठेवावे. नारळावर एक लाल दोरा गुंडाळून घ्यावा. श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीसोबत नारळाचीही पूजा करावी. पूजा झाल्यानंतर हे नारळ तिजोरीत किंवा धन स्थानावर ठेवावे. हे नारळ दिवसभर तिजोरीतच ठेवावे. रात्री नारळ तिजोरीतून काढून एखाद्या गणेश मंदिरात अर्पण करावे. यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मीकडे गरिबी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.


  मान्यतेनुसार या उपायाने थोड्या दिवसातच सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकते. हा उपाय करण्यासोबतच दैनंदिन जीवनात सर्व अधार्मिक कार्यापासून स्वतःला दूर ठेवावे, अन्यथा उपाय निष्फळ होऊ शकतो.


  शनी दोष दूर करण्याचा उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • Shukrawar che Upay in marathi

  शनी दोष दूर करण्यासाठी उपाय -
  शनी दोष दूर करण्यासाठी तेलाशी संबंधित उपाय अधिक प्रभावी राहतात. तुम्हालाही शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहायचे असल्यास दररोज नारळाच्या तेलामध्ये कापूर मिसळून हे तेल डोक्याला लावावे. असे केल्याने शनी दोषातून मुक्ती मिळेल तसेच केस चमकदार आणि मजबूत होतील. नारळाचे आणि या तेलाचे दान एखाद्या गरिबाला करावे.

Trending