Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Small Coconut Astrological Measure

लघु नारळाचे 4 उपाय, एकही केल्यास सुरु होऊ शकतो धनलाभ

रिलिजन डेस्क | Update - May 10, 2018, 12:18 PM IST

तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे, ती म्हणजे लघु नारळ.

 • Small Coconut Astrological Measure

  तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे, ती म्हणजे लघु नारळ. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असते. पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहजपणे मिळू शकते. लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो, विशेषतः धन-संपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये. येथे जाणून घ्या, लघु नारळाचे काही खास उपाय...


  1. एका चौरंग किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावताना 27 वेळेस खालील दिलेल्या मंत्राचा मनातल्या मनात जप करावा. या उपायाने धन लाभाची शक्यता वाढेल.
  मंत्र- ऐं ह्लीं श्रीं क्लीं


  2. 11 लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून खाली दिलेल्या मंत्राचा 2 माळ जप करावा.
  मंत्र- ऊं महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्
  त्यानंतर हे सर्व नारळ एक लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.


  पुढील स्लाईडवर वाचा, इतर काही खास उपाय...

 • Small Coconut Astrological Measure

  3. घरामध्ये नेहमी धन-धान्य आणि सुख-शांती हवी असल्यास 11 लघु नारळ पिवळ्या कपड्यात बांधून स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला अडकवून ठेवावेत.


  4. लघु नारळ देवघरात स्थापन करून याची नियमितपणे पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील आर्थिक अडचणी दूर होतात.

Trending