Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Tantra che Upay For Money

घर किंवा दुकानाच्या चौकटीवर लावा तंत्रची ही 1 गोष्ट, होईल फायदा आणि लागणार नाही दृष्ट

रिलिजन डेस्क | Update - Jun 13, 2018, 12:02 AM IST

पैशांशी संबंधित समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी महालक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली आहे.

 • Tantra che Upay For Money

  पैशांशी संबंधित समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी महालक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली आहे. यामुळे समुद्रातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. उदा. दक्षिणावर्ती शंख आणि गोमती चक्र. लक्ष्मी पूजेमध्ये या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तंत्र शास्त्रामध्ये गोमती चक्राचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. गोमती चक्राच्या उपायाने वाईट दृष्टचा प्रभावही नष्ट केला जाऊ शकतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, गोमती चक्राचे काही खास उपाय...


  असे असते गोमती चक्र -
  ज्योतिषीय उपाय करताना एका विशेष दगडाचा वापर केला जातो. तो दिसायला साधारण दगडासारखाच दिसतो. परंतु, त्‍याचा प्रभाव असाधारण असतो. या दगडालाच गोमती चक्र म्‍हणतात. गोमती चक्राचा एक भाग उथळ तर मागील भाग अतिशय गुळगुळीत पांढरा असतो. मागील भागावर 7 हा अंक असतो. कमी किमतीला मिळणारे हे दगड गोमती नदीत मिळतात, म्‍हणून यांना गोमती चक्र म्‍हणतात. गोमती चक्रामुळे विविध समस्या दूर करणे शक्य आहे.


  गोमती चक्राचे उपाय
  1. कोणत्याही शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करावी. देवी लक्ष्मी पूजेमध्ये 11 गोमती चक्र ठेवावेत. पूजेनंतर सर्व गोमती चक्र एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. यामुळे धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.


  2. व्यापारात लाभ होत नसल्यास पूजेमध्ये ठेवण्यात आलेले दोन गोमती चक्र लाल कपड्यात बांधून दुकानाच्या चौकटीवर लटकावून ठेवा. असे केल्याने दुकानाला कोणाचीही वाईट दृष्ट लागणार नाही. घराच्या चौकटीवर गोमती चक्र बांधून ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.


  इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • Tantra che Upay For Money

  3. एखाद्या लहान बाळाला वारंवार दृष्ट लागत असेल तर त्यावरून 11 गोमती चक्र उतरवून एखाद्या चौकामध्ये फुकून द्यावेत आणि मागे वळून न पाहता घर निघून यावे.


  4. वारंवार धनहानी होत असेल तर 11 गोमती चक्रावर हळद लावून हे पिवळ्या कपड्यात गुंडाळून संपूर्ण घरात फिरवावेत. त्यानंतर एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करावेत. यामुळे धनहानी होणार नाही.

Trending