Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | अक्षय्य तृतीया Tantra Measures For Akshay Tritiya 18 April 2018

बुधवारी शुभ संयोगात करा तंत्रचे उपाय, होऊ शकतो पैशांशी संबंधित फायदा

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 17, 2018, 08:21 AM IST

ज्योतिष शास्त्रानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी खूप खास आहे, कारण या दिवशी अक्षय्य तृतीयेचा सण

 • अक्षय्य तृतीया Tantra Measures For Akshay Tritiya 18 April 2018

  ज्योतिष शास्त्रानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी खूप खास आहे, कारण या दिवशी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहता केले जाऊ शकते. या वर्षी अक्षय्य तृतीया 18 एप्रिल, बुधवारी आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते असे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या खास उपायांची माहिती देत आहोत. हे उपाय विधीपूर्वक केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


  अक्षय्य तृतीयेच्या रात्री साधकाने स्नान करून पिवळ्या रंगाचे धोतर नेसावे. उत्तर दिशेला तोंड करून आसनावर बसावे. विष्णू मंत्राने सिद्ध केलेले सिद्ध लक्ष्मी यंत्र समोर ठेवावे. स्फटिकच्या माळेने 21 माळी खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा. जप करत असताना मधेच उठू नये. एकाग्र मनाने जप करावा.


  मंत्र
  ऊँ श्रीं ह्रीं श्रीं ऐं ह्रीं श्रीं फट्


  हा उपाय विधीपूर्वक केल्यास धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाच्या आर्थिक समस्या दूर करते.


  इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • अक्षय्य तृतीया Tantra Measures For Akshay Tritiya 18 April 2018

  देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उपाय -
  अक्षय्य तृतीयेच्या रात्री लाल वस्त्र परिधान करून एकांत ठिकाणी बसा. समोर दहा लक्ष्मीकारक कवड्या ठेवून एक मोठा तेलाचा दिवा लावा. प्रत्येक कवडीला शेंदूर लावून घ्या. त्यानंतर खालील मंत्राचा यथाशक्ती जप करा.


  मंत्र - ऊं ह्रीं श्रीं श्रियै फट्


  या उपायाने धनाची देवी लकवर प्रसन्न होते आणि साधकाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

 • अक्षय्य तृतीया Tantra Measures For Akshay Tritiya 18 April 2018

  ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्याचा उपाय -
  जन्म कुंडलीतील ग्रहांचा तुमच्या जीवनावर अशुभ प्रभाव असेल तर येहे सांगण्यात आलेला उपाय अक्षय्य तृतीयेपासून सुरु करू शकता.


  उपाय -
  अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून सूर्यदेवाला पूर्वेकडे तोंड करून खालील मंत्राचा उच्चार करीत अर्घ्य द्यावे.


  ऊँ भास्कराय विग्रहे महातेजाय धीमहि, तन्नो सूर्य: प्रचोदयात् ।


  हा उपाय दररोज करावा. या उपायाने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.

 • अक्षय्य तृतीया Tantra Measures For Akshay Tritiya 18 April 2018

  धन लाभासाठी उपाय
  अक्षय तृतीयेच्या रात्री १० वाजता स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. उत्तर दिशेला तोंड करून आसनावर बसा. समोर एक चौरंग घेऊन एका ताटात स्वस्तिक किंवा ऊँ काढून त्यावर महालक्ष्मी यंत्र स्थापित करा. त्यानंतर एक शंख दुस-या ताटात स्थापीत करा. थोडे तांदूळ केशरात रंगवून ते त्या शंखात टाका. शुद्ध तुपाचा दिवा लावून खाली दिलेल्या मंत्राचा ११ माळ जप करा.


  मंत्र
  सिद्धि बुद्धि प्रदे देवि मुक्ति मुक्ति प्रदायिनी।
  मंत्र पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते।।


  जप झाल्यानंतर सर्व सामग्री नदीत किंवा तलावात विसर्जित करा. हा उपाय केल्याने थोड्या दिवसातच तुम्हाला अचानक धनलाभ होईल.

 • अक्षय्य तृतीया Tantra Measures For Akshay Tritiya 18 April 2018

  अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी. पूजेमध्ये या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. लक्ष्मी, भगवान नारायणची पत्नी असून त्यांना अत्यंत प्रिय आहेत. लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे. शंख, मोती, कवडी या समुद्रातून प्राप्त होणाऱ्या गोष्टी नारायणाला प्रिय आहेत. यामुळे लक्ष्मी पूजेमध्ये या वस्तू अवश्य असाव्यात. पूजा झाल्यानंतर या वस्तू धन स्थानवर ठेवल्यास धनामध्ये वृद्धी होईल.

Trending