Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Unknown Facts Of Amawasya Tithi

बहुतांश लोकांना माहिती नसाव्यात अमावास्येशी संबंधित या 7 गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Jun 13, 2018, 02:16 PM IST

आज (13 जून) अधिक मासातील अमावास्या तिथी आहे. हिंदू पंचांगामध्ये एक महिन्याला 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभागण्यात

 • Unknown Facts Of Amawasya Tithi

  आज (13 जून) अधिक मासातील अमावास्या तिथी आहे. हिंदू पंचांगामध्ये एक महिन्याला 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभागण्यात आले आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कला पूर्ण रूप घेते आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र कलांचा क्षय होतो. काही मतमतांतरानुसार काही लोक शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी किंवा प्रतिपदा तिथीला महिन्याची सुरुवात करतात, तर काही लोक कृष्ण पक्षातील पहिल्या दिवसाला मासारंभ मानतात. या क्रमामध्ये कृष्ण पक्षातील पंधरावा दिवस किंवा शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात.


  धर्मग्रंथामध्ये चंद्राच्या सोळाव्या कलेला 'अमा' सांगण्यात आले आहे. स्कंद पुराणातील श्लोकानुसार
  अमा षोडशभागेन देवि प्रोक्ता महाकला।
  संस्थिता परमा माया देहिनां देहधारिणी ।।

  अर्थ - चंद्रमंडळातील अमा नावाची महाकला आहे, ज्यामध्ये चंद्राच्या सोळा कलांची शक्ती आहे. या शक्तीचा क्षय आणि उदय होत नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सूर्य आणि चंद्राच्या मिलन काळाला अमावस्या म्हणतात. या दिवशी सूर्य आणि चंद्र एकत्र राहतात. यामुळे शास्त्रामध्ये या तिथीची विविध नावे सांगण्यात आली आहेत - सूर्य-चंद्र संगम, पंचदशी. अमावासी. अमावासी किंवा अमामासी.


  पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, अमावस्या तिथी संदर्भात इतर काही खास गोष्टी...

 • Unknown Facts Of Amawasya Tithi

  - ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र ज्या दिवशी एकत्र असत त्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी हे दोन्ही ग्रह एकत्र एकाच राशीमध्ये असतात म्हणजेच या दिवशी दोन्ही ग्रहांचे मिलन होते. आज 13 जून रोजी सूर्य आणि चंद्र दोघेही एकत्र मेष राशीमध्ये स्थित आहेत.


  - शास्त्रामध्ये अमावस्या तिथीचे स्वामी पितृदेव यांना मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण, दान-पुण्य करण्याचे महत्त्व आहे.


  - अमावास्येच्या दिवशी सोम, मंगळ आणि गुरुवारसोबत जेव्हा अनुराधा, विशाखा, आणि स्वाती नक्षत्राचा योग जुळून येतो, तेव्हा हा योग अत्यंत पवित्र मानला गेला आहे.


  - या व्यतिरिक्त शनिवार आणि चतुर्दशी योगही विशेष फळ प्राप्त करून देणारे मानले गेले आहेत. या योगामध्ये तीर्थस्नान, जप, तप, व्रत पुण्याने कर्ज आणि विविध पापामधून मुक्ती मिळते. त्यामुळे हा काळ संयम, साधना आणि तप करण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो.


  पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, अमवस्या तिथीचे पुराणात सांगण्यात आलेले काही व्रतविधी...

 • Unknown Facts Of Amawasya Tithi

  सोमवती अमावस्या- सोमवारच्या दिवशी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणतात. ही अमावस्या वर्षातून जवळपास एकदाच येते. या अमावास्यचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी व्रत करतात.


  अमावस्या पयोव्रत - या व्रतामध्ये केवळ दुध ग्रहण केले जाते. भगवान विष्णूची आराधना केली जाते. हे व्रत एकवर्ष केले जाते. या व्रताने तन, मन आणि धनाच्या कष्टातून मुक्ती मिळते.


  अमावस्या व्रत- कर्म पुराणानुसार या दिवशी महादेवाची उपासना केल्यास गंभीर आजारातून मुक्ती मिळते.

Trending