Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | We Should Do These 4 Good Works At The Time Of Shavyatra

एखादी अंत्ययात्रा दिसल्यानंतर हे 4 शुभ काम अवश्य करावेत

रिलिजन डेस्क | Update - Jun 12, 2018, 12:02 AM IST

श्रीमद्भागवत गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, मनुष्याचे शरीर नश्वर आहे, अमर केवळ आत्मा आहे.

 • We Should Do These 4 Good Works At The Time Of Shavyatra

  श्रीमद्भागवत गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, मनुष्याचे शरीर नश्वर आहे, अमर केवळ आत्मा आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची अंत्ययात्रा काढली जाते. शवयात्रा संदर्भात विविध मान्यता प्रचलित आहेत. एखादी अंत्ययात्रा दिसल्यास आपण चार शुभ काम करणे आवश्यक आहे. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि भागवत कथाकार पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, एखादो अंत्ययात्रा दिसल्यास आपण काय करावे...


  पहिले शुभ काम
  पं. नागर यांच्यानुसार, जो व्यक्ती अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊन शवाला खांदा देतो त्याच्या पुण्यामध्ये वाढ होते. या पुण्य प्रभावाने जुने पाप नष्ट होतात. याच मान्यतेमुळे बहुतांश लोक अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊन शवाला खांदा अवश्य देतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तीन शुभ कामांविषयी....

 • We Should Do These 4 Good Works At The Time Of Shavyatra

  दुसरे शुभ काम 
  काही कारणास्तव तुम्हाला एखाद्या अंत्ययात्रेमध्ये जाणे शक्य नसल्यास अंत्ययात्रा दिसल्यानंतर जागेवरच उभे राहावे. पहिले अंत्ययात्रा पुढे जाऊ द्यावी. देवाकडे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना करावी.

 • We Should Do These 4 Good Works At The Time Of Shavyatra

  तिसरे शुभ काम 
  कुठीही कोणत्याही व्यक्तीची अंत्ययात्रा दिसल्यास राम नामाचा जप करावा. श्रीरामचरितमानसनुसार राम नामाचा जप केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की, मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यामध्ये म्हणजेच महादेवामध्ये विलीन होते. यामुळे अंत्ययात्रा दिसल्यास राम नामाचा जप केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होऊ शकते.


  चौथे शुभ काम 
  कुठेही एखादी अंत्ययात्रा दिसल्यास आपण जागेवरच मौन व्हावे. कार किंवा बाईकवर असल्यास अशावेळी हॉर्न वाजवू नये. हे काम मृत व्यक्तीविषयी आदर आणि सन्मानाची भावना प्रकट करते.

Trending