वारंवार नुकसान होत / वारंवार नुकसान होत असल्यास सुरु करा हे 5 शुभ काम, हळू-हळू वाढू लागेल सुख-समृद्धी

May 13,2018 12:44:00 PM IST

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांशी संबंधित दोष असल्यास, त्या व्यक्तीला जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. योग्य पद्धतीने काम करूनही वारंवार नुकसान होत राहते. अशा परिस्थितीमध्ये ज्योतिष उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार असे काही शुभ काम, ज्यामुळे घरातील सुख-समृद्धी वाढू शकते...


1. दररोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीने घराचे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते. रांगोळी देवी-देवतांच्या सन्मान आणि स्वागतासाठी काढली जाते. ज्या घराबाहेर दररोज सुंदर रांगोळी काढली जाते, त्या घरावर सर्व देवी-देवतांची कायम कृपा राहते.


2. घराबाहेर फुलांचा गुच्छ ठेवावा. हे शक्य नसल्यास दारावर तोरण अवश्य बांधावे. यासोबतच दरवाजाच्या बाहेर छोटीशी घंटी लावू शकता. या उपायाने सौभाग्य वाढू शकते आणि महालक्ष्मी घरात प्रवेश करेल.


3. घरासमोर सुंदर आणि स्वच्छ बगीचा असल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. घराबाहेर अनुपयोगी गवत आणि झाड लावू नये. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, स्वच्छता असल्यास सकारात्मकता वाढते.


पुढील स्लाईडवर वाचा, इतर दोन उपाय...

4. घराच्या दरवाजासमोर आणि जवळपास व्यर्थ सामान ठेवू नये. असे केल्याने घरातील लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे घराचा दरवाजा आणि जवळपासची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. 5. मुख्य दरवाजावर आपल्या कुलदेवतेचे प्रतीक चिन्ह उदा. स्वस्तिक, ऊँ, त्रिशूळ इ. काढावेत. रोज सकाळी या चिन्हांची पूजा करावी. असे केल्याने घरामध्ये बरकत कायम राहते.
X