Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Old Traditions About Money Problems

सुरु झाला नवीन महिना जुलै 2018, आजपासून हे 3 काम केल्यास होऊ शकतो धन लाभ

रिलिजन डेस्क | Update - Jul 01, 2018, 12:47 PM IST

नवीन महिना जुलै 2018 सुरु झाला आहे. मान्यतेनुसार दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस शुभ राहतो.

 • Old Traditions About Money Problems

  नवीन महिना जुलै 2018 सुरु झाला आहे. मान्यतेनुसार दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस शुभ राहतो. ठीक याचप्रकारे महिन्याच्या सुरुवातीपासून काही शुभ काम सुरु केल्यास संपूर्ण महिना लाभदायक ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असल्यास त्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषमध्ये ग्रहदोष आणि वाईट काळ दूर करण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही काम ज्यामुळे जुलै 2018 मध्ये लाभाचे योग जुळून येऊ शकतात आणि कुंडलीतील दोष दूर होतात...


  # भगवान श्रीविष्णू, महालक्ष्मी आणि देवी सरस्वस्तीची कृपा प्राप्त करून देणारा मंत्र
  कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
  करमूले तू गोविंद: प्रभाते करदर्शनम्॥


  शास्त्रानुसार आपल्या हाताच्या पुढील भागात देवी लक्ष्मी, मध्यभागी देवी सरस्वती आणि मूळभागात भगवान विष्णूंचा वास आहे. यामुळे सकाळी उठताच दोन्ही हातांकडे पाहून या मंत्राचा जप करावा.


  पुढील स्लाईड्सवर वाचा इतर दोन उपाय...

 • Old Traditions About Money Problems

  # नऊ ग्रहांचे दोष दूर होतात या मंत्राने 
  ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुः शशी भूमिसुतो बुधश्च।
  गुरुश्च शुक्रः शनि राहुकेतवः कुर्वन्तु सर्वे ममसुप्रभातम्॥


  या मंत्राचा जप केल्याने सर्व देवी-देवता आणि नवग्रहांची कृपा प्राप्त होते. या मंत्राचा अर्थ ब्रह्मा, विष्णू, शिव, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या सर्वांनी माझी प्रातःकाळी म्हणजेच सकाळ मंगलमय करावी.
  हे शुभ काम सकाळी झोपेतून उठताच केल्यास वाईट काळातून मुक्ती मिळू शकते.

 • Old Traditions About Money Problems

  # स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला प्रसन्न करावे 
  सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या कलशाने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्यदेव नवग्रहांचे राजा आणि पंचकदेवांपैकी एक आहेत. यांची पूजा केल्याने वाईट काळ दूर होऊ शकतो.

Trending