रविवारी रात्री जुळून / रविवारी रात्री जुळून येत आहे दुर्लभ योग, काळ्या उडदाच्या या उपायांनी होऊ शकतो धन लाभ

यूटिलिटी डेस्क

Apr 07,2018 02:21:00 PM IST

रविवार, 8 एप्रिल 2018 ला चैत्र मासातील अष्टमी तिथी आहे. या अष्टमीला कालाष्टमी नावानेही ओळखले जाते. या दिवशी संध्याकाळी चंद्र, शनी आणि मंगळ एकत्र धनु राशीत राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार रविवारी कालाष्टमी तिथी आल्यामुळे ही रात्र आणखीनच खास झाली आहे. रविवारचे कारक देवता काळभैरव असून ही तिथीही काळभैरवाला समर्पित आहे. रविवार आणि अष्टमीचा योग अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी दैत्यांचे गुरु शुक्र ग्रह (मेष राशीमध्ये) आणि देवतांचे गुरु बृहस्पती (तूळ राशीमध्ये) एकमेकांच्या समोर राहतील. या ग्रह स्थितीमुळे कालाष्टमीला करण्यात आलेले तंत्र उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय...

या रात्री तांत्रिक करतात तंत्र क्रिया तंत्र शास्त्रामध्ये कालाष्टमीची रात्र तांत्रिक क्रियांसाठी खूप खास मानली जाते. यामुळे या रात्री तंत्रचे जाणकार तांत्रिक क्रिया करतात. तंत्र क्रिया उदा. जादूटोणा, तंत्र-मंत्र, वशीकरण आणि इतर रहस्यमयी विद्यांचा उपयोग या रात्री केला जातो. या सर्व क्रिया अत्यंत सावधपणे केल्या जातात कारण या क्रियांमधील चूक जीवनात अडचणी वाढवू शकते.1. रविवारी रात्री उडदाच्या पिठाची एक गोड पोळी तयार करून त्यावर तेल लावावे. त्यानंतर ही पोळी रात्रीच एखाद्या श्वानाला खाऊ घालावी. 2. एखादा व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल तर काळ्या उडदाची पोळी त्यावरून 11 वेळेस उतरवून एखाद्या श्वानाला खाऊ घाला. 3. रविवारी रात्री भगवान काळभैरवाला सव्वाशे ग्रॅम अखंड काळे उडीद अर्पण करावेत. पूजा करावी. पूजा झाल्यानंतर अर्पण केलेल्या उडदामधील 11 दाणे घ्यावेत. हे दाणे आपल्या कार्यस्थाळावर ठेवावेत. 4. अखंड उडीद, लाल फुल, लाल मिठाई, आणि लिंबू संध्याकाळी काळभैरवाला अर्पण करावेत.

या रात्री तांत्रिक करतात तंत्र क्रिया तंत्र शास्त्रामध्ये कालाष्टमीची रात्र तांत्रिक क्रियांसाठी खूप खास मानली जाते. यामुळे या रात्री तंत्रचे जाणकार तांत्रिक क्रिया करतात. तंत्र क्रिया उदा. जादूटोणा, तंत्र-मंत्र, वशीकरण आणि इतर रहस्यमयी विद्यांचा उपयोग या रात्री केला जातो. या सर्व क्रिया अत्यंत सावधपणे केल्या जातात कारण या क्रियांमधील चूक जीवनात अडचणी वाढवू शकते.

1. रविवारी रात्री उडदाच्या पिठाची एक गोड पोळी तयार करून त्यावर तेल लावावे. त्यानंतर ही पोळी रात्रीच एखाद्या श्वानाला खाऊ घालावी. 2. एखादा व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल तर काळ्या उडदाची पोळी त्यावरून 11 वेळेस उतरवून एखाद्या श्वानाला खाऊ घाला. 3. रविवारी रात्री भगवान काळभैरवाला सव्वाशे ग्रॅम अखंड काळे उडीद अर्पण करावेत. पूजा करावी. पूजा झाल्यानंतर अर्पण केलेल्या उडदामधील 11 दाणे घ्यावेत. हे दाणे आपल्या कार्यस्थाळावर ठेवावेत. 4. अखंड उडीद, लाल फुल, लाल मिठाई, आणि लिंबू संध्याकाळी काळभैरवाला अर्पण करावेत.
X
COMMENT