Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Kundli Reading And Pitra Dosh

या छोट्या-छोट्या 6 उपायांनी दूर होऊ शकतो वाईट काळ, मिळेल भाग्याची साथ

रिलिजन डेस्क | Update - Jun 09, 2018, 07:59 AM IST

ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही योग सांगण्यात आले आहेत, जे व्यक्तीच्या दुर्भाग्याचा संकेत देतात.

 • Kundli Reading And Pitra Dosh

  ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही योग सांगण्यात आले आहेत, जे व्यक्तीच्या दुर्भाग्याचा संकेत देतात. असाच एक योग पितृ दोष आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असेल त्यांना अपत्याशी संबंधित अडचण राहते. यासोबतच पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते, घरात पैशांची तंगी भासते आणि वारंवार आजारपणाला सामोरे जावे लागते. वैवाहिक जीवनात अशांती राहते. ज्योतिषमध्ये पितृदोषापासून दूर राहण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार पितृ दोष आणि वाईट काळ दूर करण्याचे सोपे उपाय...


  पहिला उपाय
  प्रत्येक मासातील अमावस्या तिथीला पितर देवतांची तर्पण, श्राद्ध आणि धूप-ध्यान करावे.


  दुसरा उपाय
  रोज सकाळी आणि संध्याकाळी केलेल्या स्वयंपाकातील पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावे. पोळीवर साखर, दही आणि तुळशीचे एक पान ठेवून ही पोळी गायीला खाऊ घालावी. शेवटची पोळी श्वानाला खाऊ घालावी.


  तिसरा उपाय
  प्रत्येक शनिवार आणि अमावस्या तिथीला सकाळी लवकर उठावे. स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला दूध आणि जल अर्पण करावे.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

 • Kundli Reading And Pitra Dosh

  चौथा उपाय 
  घरामध्ये गीता पाठ करावेत. पितृ पक्ष म्हणजे श्राद्ध पक्षात ब्रह्मचर्यचे पालन करावे.


  पाचवा उपाय 
  प्रत्येक महिन्यात अमावस्येला कावळ्यांना खाण्यासाठी घराच्या छतावर पोळीचे छोटे-छोटे तुकडे टेकवून ठेवावेत. यामुळे पितर देवता प्रसन्न होतात.


  सहावा उपाय
  घरामध्ये एखाद्या व्यक्तीला अकाली किंवा अपघातामध्ये मृत्यू झाला असेल तर त्यांच्यासाठी पितृ पक्षातील अमावस्येला तांब्याचे भांडे, कपडे आणि धान्य दान करावे.

Trending