Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Money Problems And Astro Tips In Marathi

दिव्याचे 11 चमत्कारी उपाय : एकही केल्यास घरात होणार नाहीत वाद, पतीला मिळेल भाग्याची साथ

रिलिजन डेस्क | Update - Jul 03, 2018, 08:50 AM IST

पती आणि पत्नीचे भाग्य एकमेकांशी जोडलेले राहते. याच कारणामुळे एकाच्या शुभ कामाने दुसऱ्याचे भाग्य बदलू शकते.

 • Money Problems And Astro Tips In Marathi

  पती आणि पत्नीचे भाग्य एकमेकांशी जोडलेले राहते. याच कारणामुळे एकाच्या शुभ कामाने दुसऱ्याचे भाग्य बदलू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पत्नीसाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे पतीचे दुर्भाग्य दूर होऊ शकते आणि संपूर्ण कुटूंबात सुख-समृद्धी वाढते. हे उपाय दिव्याशी संबंधित आहेत. येथे जाणून घ्या, दिव्याचे काही खास उपाय...


  पहिला उपाय
  घरातील स्त्रीने रोज संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावून ऊँ श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मयै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. हा उपाय रोज केल्यास पतीला भाग्याची साथ मिळू शकते.


  दुसरा उपाय
  पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यास रोज सकाळी प्रभू श्रीराम आणि देवी सीतेच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा. अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.


  तिसरा उपाय
  शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी सोमवार आणि शनिवार या दिवशी भैरव मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.


  चौथा उपाय
  घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त करण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन दिवा लावावा आणि आरती करावी. हा उपाय पती-पत्नी दोघांनीही करावा.


  पाचवा उपाय
  रोज संध्याकाळी दरवाजाच्या दोन्ही बाजूनं तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दिव्याचे आणखी सहा उपाय...

 • Money Problems And Astro Tips In Marathi

  सहावा उपाय 
  कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या कुंडलीत राहू-केतुचे दोष असल्यास घरात सकाळ-संध्याकाळ जवसाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे राहू-केतुचे दोष दूर होऊ शकतात.


  सातवा उपाय 
  प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात तेलाचा दिवा लावावा. यासोबतच तेलाचे दान करून शनिदेवाकडे अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.


  आठवा उपाय
  कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी भगवान विष्णू किंवा बालगोपाळासमोर तुपाचा दिवा लावून ऊँ नमो भगवते वासुदेवाय किंवा कृं कृष्णाय नम: मंत्राचा जप करावा.

 • Money Problems And Astro Tips In Marathi

  नववा उपाय 
  सुख-समृद्धी आणि बुद्धिसाठी देवी सरस्वतीसमोर तुपाचा दोनमुखी म्हणजे दोन वातींचा दिवा लावावा.

   

  दहावा उपाय 
  घरामध्ये बरकत कायम ठेवण्यासाठी श्रीगणेशासमोर तीनमुखी म्हणजे तीन वातींचा दिवा लावावा.


  अकरावा उपाय 
  धन संबंधित अडचणी दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीसमोर सातमुखी (सात वातींचा) दिवा लावावा.

Trending