Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Science Behind The Holi Festival

बदलत्या वातावरणात आरोग्यही राहावे ठीक, हेसुद्धा आहे होळी सणामागचे कारण

यूटिलिटी डेस्क | Update - Feb 26, 2018, 03:49 PM IST

गुरुवार, 1 मार्च रोजी होळीचे दहन केले जाईल आणि 2 मार्च (शुक्रवारी) रंग खेळला जाईल. हा सण साजरा करण्यामागे

 • Science Behind The Holi Festival
  गुरुवार, 1 मार्च रोजी होळीचे दहन केले जाईल आणि 2 मार्च (शुक्रवारी) रंग खेळला जाईल. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व म्हणजे भगवान विष्णु, भक्त प्रल्हाद, असुर राज हिरण्यकश्यपु आणि होलिकाशी संबधित आहे. तर, वैज्ञानिक महत्त्व हे वातावरणातील बदलाशी संबधित आहे. या काळात थंडी (हिवाळा) संपून उन्हाळा सुरू होण्यास प्रारंभ होतो. वातावरणात होणा-या बदलांमुळे अनेक आजार होण्याची भिती अधिक असते. या काळात अनेकांची रोगप्रतिकरक क्षमता कमजोर झालेली असते. त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सांगत या संदर्भातील काही खास गोष्टी...

 • Science Behind The Holi Festival

  होळीला प्रदक्षिणा घालाव्यात
  आयुर्वेदानुसार दोन ऋतुंच्या संधि काळात अनेक आजार होण्याची भिती अधिक असते. होळी, हिवाळा आणि उन्हाळा यामधील संधि काळ आहे. याकाळात कफ, खोकला, श्वासा संबंधी त आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी काही वेळासाठी जळत्या होळी शेजारी उभे राहावे किंवा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे शरीरास पर्याप्त प्रमाणात उर्जा मिळण्यास मदत होईल.

 • Science Behind The Holi Festival

  जळत्या होळीला प्रदक्षिणा घातल्यामुळे 140 फेरेनाईट उष्णता शरीरात प्रवेश करते. यामुळे रोग उत्पन्न करणाऱ्या किटाणूंनी आपल्यावर अक्रम केले तरी त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होत नाही, याउलट आपल्या शरीरात समाविष्ट झालेल्या उष्णतेमुळे हे किटाणू स्वःच नष्ट होतात.

 • Science Behind The Holi Festival

  चंद्राच्या प्रकाशात काही काळ बसा
  गुरुवार 1 मार्च रोजी फाल्गुनी पोर्णिमा आहे. पोर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असल्याचे मानले जाते. त्यामुळे पोर्णिमेच्या रात्री थोड्यावेळासाठी चंद्राच्या प्रकाशात बसावे. तसेच या दिवशी चंद्राकडे पाहिल्याने डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत होते व मनाला शांतता लाभते.

Trending