Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | shani che Upay In marathi

शनिवारी हे एक काम केल्यास शनिदेव दूर करू शकतात तुमची गरिबी

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 23, 2018, 10:27 AM IST

ज्योतिष आणि वास्तूच्या मान्यतेनुसार ज्या घरामध्ये व्यर्थ सामान (भंगार) पडलेले असते तेथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजे

 • shani che Upay In marathi

  ज्योतिष आणि वास्तूच्या मान्यतेनुसार ज्या घरामध्ये व्यर्थ सामान (भंगार) पडलेले असते तेथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता निवास करते. यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे असे सांगितले जाते. ज्या घरांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते, तेथे सुख-समृद्धी कायम राहते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे एक काम जे शनिवारी अवश्य करावे. यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि पैशांची कमी भासत नाही.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदेवाशी संबंधित काही खास गोष्टी...

 • shani che Upay In marathi

  शनिवारी घरातील भंगार सामान विकून टाकावे 
  प्रत्येक घरामध्ये कोणत्या न कोणत्या व्यर्थ, निकामी वस्तू पडलेल्या असतात. यामध्ये तुटके-फुटके भांडे, फाटलेले पेपर, जुने चप्पल-बूट आणि इतरही वस्तूंचा समावेश असतो. अशाप्रकारची कोणतीही वस्तू घर किंवा दुकानात असल्यास ती लगेच बाहेर काढून टाकावी. आठवड्यातील एक खास दिवस असा असतो, त्यादिवशी हे काम करणे शुभ राहते. हा दिवस आहे शनिवार. पं. शर्मा यांच्यानुसार शनिवारी घरातील व्यर्थ सामान विकल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते. घर-कुटुंबाला अडचणीतून मुक्ती मिळते.

 • shani che Upay In marathi

  लोखंडाच्या वस्तूंचा कारक आहे शनी 
  बहुतांश लोकांचा घरात भंगारातील वस्तू लोखंडाच्या असतात. ज्योतिषनुसार लोखंड शनीचा धातू आहे. हा धातू घरामध्ये व्यर्थ पडलेला असेल तर शनिदोषामध्ये वाढ होते. यामुळे शनिवारच्या दिवशी लोखंडाच्या व्यर्थ वस्तू घराबाहेर काढून टाकाव्यात. भंगार विकल्यास थोडाफार पैसा तरी घरात येऊ शकतो.

 • shani che Upay In marathi

  दूर होतात वास्तुदोष
  घरामध्ये व्यर्थ सामान असल्यास वास्तुदोष वाढतात. वास्तू दोष वाढल्यामुळे नकारात्मकता वाढते. यामुळे घरातून भंगार वस्तू काढून टाकाव्यात.

Trending