अमावस्या+सोमवार योगात या / अमावस्या+सोमवार योगात या 9 नागांचे स्मरण केल्यास नष्ट होईल हा दोष

Apr 13,2018 03:11:00 PM IST

सोमवार 16 एप्रिलला अमावास्या तिथी आहे. सोमवारी अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावास्येचा योग जुळून येत आहे. हिंदू धर्मामध्ये या अमावास्येला अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून गरजुंना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी सोमवती अमावास्येला काही खास उपाय केल्यास या दोषातून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, सोमवती अमावस्येला करण्यात येणारे काही खास उपाय.


1. सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळी स्नान करून नवनाग स्तोत्राचे पाठ करावेत. हे आहे नवनाग स्तोत्र..
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शंखपाल धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।
तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।।


2. कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अमावास्येच्या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक करून शांती पूजा करावी.


इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

3. कालसर्प दोष शांतीसाठी सोमवती अमावास्येला व्रत ठेवावे आणि चांदीच्या नाग-नागिणीची जोडी नदीमध्ये प्रवाहित करावी. 4. सोमवती अमावस्येला अष्टधातुपासून निर्मित नाग शिवलिंगावर अर्पण केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळू शकते.5. सोमवती अमावास्येच्या दिवशी रुद्राक्ष माळेने पंचाक्षर मंत्र ऊं नमः शिवायचा जप केल्याने या दोषाची शांती होते. 6. सोमवती अमावस्येला घराच्या दारासमोर दोन्ही बाजूला शेणाने नागाची आकृती तयार करून त्याची पूजा करावी. नाग स्तोत्राचा पाठ करावा.
X