आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 क्रेन, कित्‍येक मशीन्‍स झाल्‍या खराब; तरीही तोडू शकले नाही हनूमानाची मूर्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर (यूपी)- येथे 130 वर्षे जुन्‍या हनुमान मंदिराला तोडण्‍यावरुन चांगलाच वाद झाला आहे. आश्‍चर्य म्‍हणजे 3 दिवसात  जेसीबी मशीन्‍ससहित कित्‍येक मशीन्‍स खराब झाल्‍या तरीही हे मंदिर तूटू शकले नाही. शनिवारी हिंदू यूवा वाहिनीच्‍या कार्यकर्त्‍यांसह अनेक ग्रामस्‍थांनी एरा कंपनीच्‍या मॅनेजरचा पुतळा जाळून आपला रोष व्‍यक्‍त केला आणि मंदिराला तसेच ठेवण्‍याची विनंती केली. हे मंदिर तोडले गेल्‍यास मोठे आंदोलन करु, असा इशारा येथील ग्रामस्‍थांनी दिला आहे. 

 

का तोडले जात आहे मंदिर? 
- तिलहर येथील राष्‍ट्रीय महामार्ग-24 वरील कचियानी खेडा मंदिरासंबंधी हा वाद आहे. 
- येथे 130 वर्षापूर्वी बरम देव आणि बजरंगबलीच्‍या मूर्तीची स्‍थापना करण्‍यात आली आहे. मात्र रस्‍त्‍याच्‍या सपाटीकरणाकरीता एरा कंपनीला या मूर्ती हटवायच्‍या आहेत. 
- मागील 3 दिवसांपासून या विशालकाय मूर्तीला हटवणे कंपनीला चांगलेच महागात पडत असल्‍याचे दिसत आहे. 
- म्‍हटले जात आहे की, मागील 3 दिवसापासून 3 क्रेन या मूर्तीला हटवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. मात्र या मूर्तींना याचा यत्‍किंचीतही फरक पडलेला नाही. शनिवारी मूर्तीला तोडण्‍यासाठी जरनेटर आणि वाय‍ब्रेट शीन आणले गेले होते. मात्र तेही खराब झाले. 


मंदिरावरील श्रद्धा वाढली​
- येथील ग्रामस्‍थांनी या मंदिराला हटवण्‍यास जबरदस्‍त विरोध केला आहे. दुभाजकाच्‍या मध्‍येच या मूर्तीला ठेवण्‍याची ग्रामस्‍थांनी विनंती केली आहे. 
- इतक्‍या महाकाय मशीन्‍स वापरुनही मूर्तींना काहीच फरक पडत नसल्‍याने येथील ग्रामस्थांचीही या मंदिरावरील श्रद्धा वाढली आहे.
- यामुळेच हे मंदिर तोडले गेल्‍यास मोठे आंदोलन उभारु, असे येथील ग्रामस्‍थांनी म्‍हटले आहे.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ...


 

बातम्या आणखी आहेत...