Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | We Should Do These 5 Good Works In Home For Happiness

केवळ पती-पत्नीच्या चुकीमुळे नाही तर वास्तु दोषामुळेही होतात वाद, घरात सुरु करा हे 5 काम

रिलिजन डेस्क | Update - Jul 17, 2018, 12:05 AM IST

सामान्यतः पती किंवा पत्नीपैकी कोणच्याही एका चुकीमुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढतात.

 • We Should Do These 5 Good Works In Home For Happiness

  सामान्यतः पती किंवा पत्नीपैकी कोणच्याही एका चुकीमुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढतात. वास्तुनुसार घरामध्ये दोष असल्यास वादाची स्थिती निर्माण होते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते, मन अशांत राहते, क्रोध वाढतो आणि वादाची स्थिती निर्माण होते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही उपाय ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढत राहते...


  पहिला उपाय
  रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. हा उपाय पती-पत्नीने सोबत केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात.


  दुसरा उपाय
  घरामध्ये अशुभ गोष्टी ठेवू नयेत. उदा. तुटके-फुटके भांडे, बंद घड्याळ, व्यर्थ सामान घराबाहेर काढावे. या वस्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.


  तिसरा उपाय
  घराबाहेर रोज सकाळी रांगोळी काढावी किंवा शुभ चिन्ह काढावे. शुभ चिन्ह म्हणजे स्वस्तिक, ऊँ, लक्ष्मीचे चरण इ. या शुभ चिन्हांमुळे घरातील सकारात्मकता वाढते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी दोन खास उपाय...

 • We Should Do These 5 Good Works In Home For Happiness

  चौथा उपाय 
  वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी पती-पत्नीने एकत्रितपणे शिव-पार्वतीची विशेष पूजा करावी. शिवलिंगावर जल आणि जलाधारीवर कुंकू अर्पण करावे.

 • We Should Do These 5 Good Works In Home For Happiness

  पाचवा उपाय 
  कुंडलीमध्ये मंगळ किंवा गुरुची स्थिती शुभ नसल्यास या ग्रहांसाठी उपाय करावेत. मंगळासाठी मंगळवारी मसुराची डाळ दान करावी. गुरु ग्रहासाठी गुरुवारी हळकुंड दान करावे. हे दोन्ही ग्रह वैवाहिक जीवनावर खूप प्रभाव टाकतात. यामुळे हे शुभ स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे.

Trending