आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील अनेक देशांमध्ये आजही Friday the 13th ची भीती, का अशुभ मानला जातो हा दिवस?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 13 जुलै शुक्रवार आहे. जगातील अनेक देशांमध्ये या दिवसाला (13 तारीख+शुक्रवार) अशुभ मानले जाते. यालाच Friday the 13th म्हटले जाते. मान्यतेनुसार ज्या शुक्रवारी 13 तारखेचा योग जुळून येतो, त्या दिवशी एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. ख्रिश्चन धर्माचे लोक याला शैतानचा दिवस मानतात. फोबिया इन्स्टिट्यूट ऑफ एशविले, उत्तर कॅलिफोर्निया यांनी केलेल्या एका सोशल रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, अमेरिकेतील 75 टक्के लोकसंख्या 13 तारीख आणि शुक्रवार संयोगाने भयभीत राहते. भारतात राहणारे ख्रिश्चन समुदायाचे लोकही या दिवसाला अशुभ मानतात.


का अशुभ आहे 13 अंक
13 क्रमांकाशी विविध अंधश्रद्धा जोडलेल्या आहेत. न्यूमरोलॉजीमध्ये हा अपूर्ण अंक मानण्यात आला आहे. यामागचे कारण म्हणजे, 13 अंक 12 नंतर येतो आणि याला कोणत्याही नंबरने भाज्य (भागले) जाऊ शकत नाही. यामुळे या अंकात संतुलनची कमी मानण्यात आली आहे. काही काळापूर्वी रोममध्ये फाशीची शिक्षा शुक्रवारी देण्याचे चलन होते. एका शतकापूर्वी अमेरिकेतही हीच प्रथा होती. यामुळे 13 अंक आणि शुक्रवारचा योग अशुभ असल्याची प्रथा प्रचलित झाली.


अशी आहे 13 अंकाची दहशत
जगातील अनेक देशांमध्ये 13 अंकाची दहशत अशाप्रकारे आहे की, 13 तारखेला लोक प्रवास करत नाहीत, कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडत नाहीत. काही देशांमधील बिल्डींग्समध्ये 13 क्रमांकाचा फ्लोअर आणि फ्लॅटही नसतो. ख्रिश्चन धर्मातही 13 तारीख अशुभ मानली जाते. या धर्माच्या मान्यतेनुसार याच तारखेला इसा मसीहा यांना सुळेवर चढवण्यात आले होते.


13 चा अर्थ मृत्यू
टॅरो ज्योतिषमध्ये 13 अंकाला मृत्यूचा अंक मानले गेले आहे. येथे मृत्यूचा अर्थ येणार कठीण काळ आहे. म्हणजेच 13 अंक जीवनात येणाऱ्या संकेतांविषयी सचेत करतो. 13 अंकाचा अर्थ तुमचा कठीण काळ सुरु झाला असून पुढील मार्गात अडचणीच अडचणी आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या संदर्भात इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...