Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Why Do We Have Bells In Temples

तुम्हाला माहिती आहे का मंदिरात घंटी लावण्यामागचे सायन्स कनेक्शन ?

रिलिजन डेस्क | Update - May 08, 2018, 10:04 AM IST

हिंदू धर्मामध्ये मंदिराबाहेर घंटी किंवा घंटा (सामान्य आकारापेक्षा मोठी घंटी) लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेल

 • Why Do We Have Bells In Temples

  हिंदू धर्मामध्ये मंदिराबाहेर घंटी किंवा घंटा (सामान्य आकारापेक्षा मोठी घंटी) लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. भक्त मंदिराच्या बाहेरील घंटी वाजवणूनच देवाचे दर्शन करतात. मान्यतेनुसार, ज्या मंदिरात घंटीचा आवाज नेहमी ऐकू येतो, ते जागृत देवस्थान असते.


  सकाळ-संध्याकाळ मंदिरात पूजा-आरती करताना घंटी अवश्य वाजवली जाते. विशेष ताल आणि सुरात घंटी वाजवली जाते. मान्यतेनुसार घंटी बजावल्याने मंदिरातील प्राणप्रतिष्ठित मूर्तीमधील देवताही चैतन्यरूप होतात. ज्यामुळे त्यांची पूजा प्रभावशाली आणि लवकर फळ प्रदान करणारी मानली जाते.


  स्कंद पुराणानुसार, मंदिरात घंटी बजावल्याने व्यक्तीचे शंभर जन्मातील पाप नष्ट होतात. सृष्टीच्या प्रारंभाच्या वेळी जो नाद (आवाज) झाला होता, त्याचप्रकाराच्या आवाज घंटीतून निर्माण होतो. हाच नाद ओंकाराचा उच्चारानेसुद्धा जागृत होतो. घंटा काळाचे प्रतीकही मानला जातो. धर्म शास्त्रानुसार, प्रलयाच्या वेळीसुद्धा अशाचप्रकराचा नाद प्रकट होईल.


  पुढे वाचा, घंटा वाजवण्याचे वैज्ञानिक कारण...

 • Why Do We Have Bells In Temples

  दूर होते नकारात्मक ऊर्जा
  घंटीमधून जो आवाज निघतो, तो वातावरणाला शुध्द आणि पवित्र बनवतो. वातावरणात अनेक सूक्ष्म कीटाणु असतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. घरात सतत एकाच लयीमध्ये घंटी वाजवल्याने जो ध्वनि निघतो, तो या सूक्ष्म किटाणुंना नष्ट करतो. यासोबतच या आवाजाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. यामुळेच सर्वच मंदिरात घंटी वाजवली जाते आणि घंटीच्या आवाजाने मंदिरात सकारात्मकता जाणवते.

Trending