Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | GaneshChaturthi 11 special modak recepies

बाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल मोदक, 11 चविष्ट रेसिपी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2017, 09:30 AM IST

उद्या (25 ऑगस्ट, शुक्रवार) बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे.

 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  उद्या (25 ऑगस्ट, शुक्रवार) बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे. तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहात ना... मग बाप्पांना खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पनीर मोदक रेसिपी... एकदम स्वादिष्ट आणि बाप्पांना आवडणारे मोदक बनवा. आपला आनंद व्दिगुणीत करा. चला तर मग उशीर कसला करताय... बाप्पांचे आगमन होण्याअगोदर बनवा विविध प्रकारचे मोदक...

  पनीर मोदकासाठी साहित्य-
  - दीड वाटी मावा
  - पनीर आर्धी वाटी
  - २ वाट्या पिठीसाखर
  - वेलायची पावडर
  - थोडे केसर
  - पाऊण वाटी किसलेले खोबरे...

  कृती
  - मावा मंद आचेवर कोरडा होईपर्यंत परता आणि बाजूला ठेवा.
  - पनीरला हाताने बारीक करा आणि केसर टाकून 2-3 मिनीट थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्या.
  - आता पनीर थंड झाल्यास त्याल 2 चमचे साखर टाका. आणि छोटे-छोटे गोळे बनवा.
  - थंड झालेल्या माव्यामध्ये वेलायची आणि साखर टाकून एकत्र करा. पनीर आणि माव्याचे सारखेच गोळे बनवा. माव्याचा एक गोळा हातावर घेऊन त्याची वाटी बनवा आणि त्यात पनीरचे मिश्रण टाकून बंद करा.
  - सर्व बनवलेल्या गोळ्यांना अशाप्रकारे मोदकांचा आकार द्या.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बाप्पांच्या स्वागतासाठी अजूुन कोण-कोणत्या प्रकारचे मोदक तयार करता येऊ शकतात... चॉकलेट मोदक, खवा मोदक, पेढा मोदक, रवा मोदक, तीळाचे मोदक, उपवास मोदक, फ्राय मोदक, मुगडाळ मोदक, पारंपारिक उकडीचे मोदक, कणकेचे मोदक...

 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  रव्याचे मोदक
  साहित्य :

  - ३ वाटया अगदी बारीक रवा
  - २ चमचे तूप
  - चवीप्रमाणे मीठ

  सारणासाठी :
  १ नारळ बारीक केलेल
  - १ वाटी साखर किंवा गूळ
  - वेलची पूड, २ चमचे खसखस

  कृती :
  - मंद आचेवर बारीक केलेला नारळ परतून घ्या मग नंतर त्यात गूळ /साखर,खसखस घालून परता.
  - गूळ/साखर विरघळला की आच घालून त्यात वेलची पूड घालून सारण थंड करण्यास ठेवा .
  - ४ वाटी पाणी उकळण्यास ठेवणे.त्यात तूप व मीठ घालणे.
  - पाण्याला उकळी आल्यावर त्यात रवा घालावा.
  - चांगल्या वाफा आणून रवा शिजवून घ्या. मग तो परातीत घेवून तुपाचा हात घेवून चांगला मळून घ्या.
  - नंतर मोदकाच्या साच्यात घालून करावे. मोदक करण्यापूर्वी साच्याला आतून पातळ तुपाचा हात लावावा. ह्या मोदकांना उकड काढ्याची गरज नाही.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  पेढा मोदक
  साहित्य
  १ कप बदाम बारिक केलेले
  २ कप मिल्क पावडर
  २२५ ग्रॅम मिली क्रिम
  १ कंडेन्स्ड मिल्क
  वेलचीपूड, केशर आणि सुखामेवा (आवडीनुसार)
  सजावटीसाठी बदाम पास्ताचे काप

  कृती-
  - एका मायक्रोवेव्ह सेफ बाउलमध्ये मिल्क पावडर आणि बदाम पावडर एकत्र करा.
  - त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून मिश्रण हलवून घ्या.
  - यात थोडी मिली क्रिम आणि वेलची, केशर घालून व्यवस्थित हलवा. त्यात गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घ्यावी.
  - मिश्रण गॅसवर ठेऊन २ मिनीट गरम करा. आता मिश्रण तुम्हाला हवे तसे झाले, की ते पाहा. पुन्हा एक-एक मिनीटांच्या अंतराने मिश्रण गरम करा.
  - 10-11 मिनिटांत मिश्रण एकत्र येईल त्यानंतर बाहेर काढून घ्या.
  - हाताला तूप लावून त्या मिश्रणाला मोदकांचा आकार द्या. पिस्ता-बदामाच्या कापने मोदक सजवा.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  तिळाचे मोदक
  * पाटीसाठी -
  पारंपरिक तांदळाची उकड वरीलप्रमाणे बनवा

  * सारणासाठी - अर्धी वाटी सुक्या खोब-यांचा किस, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगादाण्याचा कूट, एक वाटी गूळ, जायफळ पूड.

  * कृती- खोबरे, तीळ, एकत्र भाजून पूड करा. सारण एकत्र करा. पाटीत भरून मोदक बनवा, खूप चविष्ट लागतात.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  उपवासाचे मोदक
  * साहित्य (पाटीसाठी)
  - एक वाटी साबुदाणा व एक वाटी शिंगाडा पीठ घ्या. एक चमचा तूप, चिमूटभर मीठ, एक वाटी पाणी. सारणासाठी दोन नारळाचा चव, गूळ किंवा साखर निम्मे अर्धा कप दूध किंवा खवा, काजू चिरून.

  * कृती - दूध, साखर, गूळ, खोबरे एकत्र शिजवा गार झाल्यावर त्यात काजू, वेलदोडे पूड घाला. पाणी, मीठ, साबुदाणा शिंगाडा पीठ एकत्र करून शिजवून घ्या. उकडीला मंद गॅसवर वाफ आणा. पाटीत सारण भरून मोदक बनवा व वाफवून घ्या.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  फ्राय मोदक 
  * साहित्य -
  पाव किलो रवा व मैदा अर्धा अर्धा पाव एकत्र करून मळून घ्या. मळताना त्यात चिमूटभर मीठ व अर्धा चमचा तूप घाला, पीठ घट्ट मळा. सारण एक खोवलेला नारळ, एक वाटी साखर, एक टेबलस्पून खसखस भाजून, वेलदोडा पूड, काजू, बदाम, बारीक चिरून एकत्र करून घ्या.

  * कृती - साखरेचा पाक करून घ्या. (पाणी घालून) त्यामध्ये खोबरे, खसखशीची पूड, चिरलेले काजू, बदाम सर्व घाला. पिठाची मोठी पोळी लाटून त्याला मध्यम आकाराच्या वाटीने गोल आकार द्या. म्हणजे सर्व मोदक एका आकाराचे दिसतील. 
  त्यामध्ये सारण भरून मोदक बनवा. ओले फडके १५ मिनिटांसाठी मोदकावर झाकून ठेवा. मंद गॅसवर बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  मूगडाळ मोदक
  साहित्य

  - 2 कप मूगडाळ
  - 50 ग्राम गुळ
  - 1 चमचा इलायची दाना
  - 2 चमचे साखर पावडर
  - 1 कप दूध
  - चिमुटभर मीठ
  - 3 कप तांदळाचे मोदक
  - 4 कप पाणी

  *कृती
  - एका मोठ्या पॅनमध्ये 1 कप पाणी टाका आणि गुळ मिळवा. हे जोपर्यंद घट्ट होत नाही तोपर्यंत गॅस सुरु असु द्या.
  - आता यामध्ये अर्धाकप दूध आणि इलायची दाने टाका आणि मंद आजेवर 2-3 मिनिटे गरम करा.
  - आता पॅनमध्ये मूगदाळ आणि 1 कप पाणी टाका. पॅनवर झाकन ठेवा आणि 7 मिनिटे हे मंद आचेवर गरम करा.
  - जर पॅनमध्ये जास्त पाणी असेल तर हे गट्ट करुन घ्या.
  - तोपर्यंत तांदुळाच्या पीठात एक चिमुटभर मीठ मिळवा. यानंतर दूध आणि 1 कप गरम पाणी मिळवा आणि पीठ मळुन घ्या.
  - आता पीठाचा गोळा घ्या आणि यावर त्यात सारण भरण्यासाठी गोल करुन घ्या.
  - यामध्ये सारण भरा आणि अशाच प्रकारे अन्य मोदक तयार करा.
  - हे सर्व मोदक एक स्टील भांड्यात ठेवा. आता प्रेशर कुकरमध्ये पाणी टाका आणि त्यामध्ये स्टील भांड्याला ठेवा.
  - चार शिट्या होईपर्यंत मोदक शिजवा. जेव्हा कुकरमधील सर्व वाफ बाहेर निघेल तेव्हा कुकरचे झाकन उघडून घ्या.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  चॉकलेट मोदक
  साहित्य :-

  खवा 1 वाटी,
  पिठी साखर 2-4 चमचा
  पिठीसाखर पाव वाटी,
  कोको पावडर 2 चमचा
  चॉकलेट इसेन्स 2-3 थेंब.

  कृती-
  - खवा पुरणयंत्रातून काढून घ्या. त्यानंतर पिठीसाखरेसोबत व्यवस्थित परतून घ्या. मिश्रण घट्ट होऊ लागले, की पातेल्यात तो गोळा फिरू लागतो.
  - त्यानंतर पातेले गॅसवरून खाली उतरा. घोटून पाच मिनिटांनी कोको पावडर व पिठीसाखर घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर साच्यात टाका. चविष्ट मोदक तयार आहेत....
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  खवा मोदक
  साहित्य

  खवा 200 ग्रॅम
  दूध 4 ते 5 चमचे
  पिठीसाखर 100 ग्रॅम
  केशर दोन वाट्या
  गुलबपाणी दोन चमचे

  कृती-
  १. भांड्यात खवा व्यवस्थित फेटून घ्या. केशर दुधात मिक्स करून ठेवा. खवा कोरडा झाल्यास कोरड्या पाट्यावर चांगला वाटा. त्यावर थोडे केशर दूध टाका. त्यानंतर मंद आचेवर कढई ठेवा.
  २. त्यात खवा घालून चांगला परतवून घ्या. खवा घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडी साखर बाजूला काढून बाकी साखर टाका. मिश्रणाला जरा वेळ मिसळा. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवा.
  ३. हातावर थोडी थोडी साखर घेऊन खव्याच्या गोळ्यातून थोडे थोडे तयार मिश्रण घेऊन त्याचे मोदक तयार करा. हे मोदक खायला रुचकर होतात. लहान मुलांना हे खुप आवडतात.
  ४. हे मोदक हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो. तसेच वाढताना केळीच्या पानात दिल्यास आणखी चांगला स्वाद साधता येऊ शकतो.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  कणकेचे मोदक
  * साहित्य -
  एक नारळाचा चव (किस), एक वाटी गूळ, एक चमचा खसखस भाजलेली, एक चमचा वेलदोडा पावडर, एक चमचा तेल, चिमूटभर मीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप, काजूचे तुकडे.
  * कृती - नारळाचा चव, गूळ एकत्र करून शिजवून घ्यावा. मिश्रण कोरडे झाल्यावर गॅस बंद करा. वेलदोडा पावडर व खसखस टाका. यात दोन मोठे चमचे साजूक तूप टाका. काजू, बदाम टाका. कणकेत मीठ, तेल, टाकून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात लावून पातळ पु-यां लाटून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या व चाळणीमध्ये किंवा मोदकपात्र असल्यास त्यात वाफवून घ्या. विसर्जनाच्या वेळी हे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात.
 • GaneshChaturthi 11 special modak recepies
  तांदळाचे पारंपरिक उकडीचे मोदक
  * साहित्य -
  तांदळाची बारीक पिठी दोन वाट्या, उकळते पाणी दोन वाट्या, मीठ अर्धा टी स्पून, साजूक तूप दोन चमचे, सारणासाठी दोन नारळांचा चव त्याच्यात अर्धा भाग गूळ किंवा साखर किंवा दोन्ही, अर्धी वाटी दूध, वेलदोडे जायफळ पूड अर्धा टी स्पून, काजू, खसखस बारीक कुटून.
  * कृती - दूध, साखर, खोबरे, गूळ एकत्र करून शिजवून घ्या. फार घट्ट करू नका. गार झाल्यावर वेलदोडे व जायफळ पूड घाला. तांदूळ पिठी पाणी, मीठ, तूप घालून उकळा, हलवून झाकण ठेवून द्या. मंद गॅसवर वाफ आणा. उकड नेहमीच गरम राहायला पाहिजे. उकड मळून सारण भरून मोदकाचा आकार द्या. कुकरमध्ये चाळणी ठेवा. तुपाचा हात चाळणीला लावा. तयार मोदक पाण्यात बुडवून मग चाळणीवर ठेवा. शिटी काढून इडलीप्रमाणे वाफवा. तुपासोबत गरम गरम खायला द्या. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आधीही करून बघा. म्हणजे नैवेद्य म्हणून चांगले जमतील.

Trending