आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या का अशुभ आहे 1 मे : वाचा कसे असतील तुमचे आजचे ग्रहतारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1 मे रोजी सूर्य मेष राशीत केतुसोबत ग्रहण योग तयार करत आहे. सूर्यावर शत्रू ग्रह शनीची पूर्ण दृष्टी आहे. यामुळे सर्व राशीच्या लोकांना सूर्य अशुभ फळ देणारा राहील. आज चंद्र उच्च राशीत असून दोन नक्षत्रांमध्ये राहील (कृतिका आणी रोहिणी). गुरुवारी या दोन नक्षत्रांच्या योगाने क्रमशः लुम्बक आणि उत्पात नावाचे अशुभ योग जुळून येत आहेत. हे योग आपल्या नावानुसार अशुभ फळ देणारे असतील.
ग्रह स्थितीनुसार जाणून घ्या, का अशुभ आहे आजचा दिवस...
शनि आणी मंगळ दोघेही वक्र चालीने चालायामान आहेत. ज्योतिषी भाषेत सांगयचे झाल्यास वक्री आहेत. या दोन्ही वक्री ग्रहांची पूर्ण दृष्टी सूर्यावर आहे. मंगळ कन्या राशीत असून सूर्याकडे अष्टम स्थानातून पाहत आहे. शनि तुल राशीत राहुसोबत आहे आणि मेष राशीतील सूर्याकडे सप्तम स्थानातून पाहत आहे. सूर्य आणि शनि एकमेकांचे शत्रू आहेत. यामुळे शनीने सूर्याकडे पाहणे अशुभ फळ देणारा संकेत आहे. आज चंद्र वृषभ राशीत राहील. बुध मेष राशीत सूर्य आणि केतुसोबत राहील, गुरु मिथुन राशीत आहे. शुक्र आपल्या उच्च राशीत असून यावर मंगळाची दृष्टी आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी...