आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Rashibhavishya Of Shubh Yog Astrology Moon Zodiac And Planets Position

मंगळवार : काहींसाठी शुभ तर काही लोकांसाठी अशुभ, जाणून घ्या का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्र दिवसभर मिथुन राशीत राहील. आजचा चंद्र काही लोकांचा दिवस शुभ बनवत आहे. चंद्राच्या स्थितीमुळे आज तीन शुभ योग जुळून येत आहेत. चंद्र आद्रा नक्षत्रामध्ये असल्यामुळे चार नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने ठरवलेले काम पूर्ण होते तसेच कामामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. हा योग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहील.

या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे साध्य नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही सर्व कामे पूर्ण करणारा तसेच धन लाभामध्ये मदत करणारा आहे. मंगळवारी चंद्र आणि मंगळाच्या दृष्टी संबंधांमुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. हा शुभ योग नावानुसार धनलाभ करून देतो. चंद्र कुंडलीनुसार आज काही राशीच्या लोकांसाठी चंद्राची स्थिती ठीक राहणार नाही. ज्या राशीच्या लोकांच्या कुंडलीत चंद्र सहाव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानात असेल त्या राशीच्या लोकांना आज अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)