राशीनुसार करा शिव / राशीनुसार करा शिव पूजा, प्रसन्न होईल लक्ष्मी

Jan 03,2014 06:28:00 PM IST
हिंदू शास्त्रात तिन्हीसाजेच्या वेळी केलेल्या महादेव पूजेला खुप महत्व असल्याचे सांगितलेले आहे. महादेव आणि
महालक्ष्मी जगाची सफर करतात म्हणुन ही वेळ शुभ असल्याचे सांगितले जाते. महादेव शब्दाचा अर्थच कल्याण
करणारा असा आहे. ज्योतीष शास्त्रातही महादेव आणि महालक्ष्मीच्या पूजेसाठी तिन्हीसाजेच्या वेळ सांगितलेली
आहे.ज्योतीष शास्त्रात ग्रहदोष दूर करण्यासाठी संध्याकाळी महादेव आणि लक्ष्मीची पूजा करण्याचा उपाय सांगितलेला
आहे. प्रत्येक राशीसाठी खास महादेव पूजा आज divyamarathi.com तुम्हाला सागणार आहे. जाने तुमचे
कल्याण होईल.
पुढील स्लाइडवर वाचा कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणती पूजा करावी...
प्रत्येक राशीच्या व्यक्तीने शिव पूजा करण्याअगोदर पाण्यात काळे तिळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. त्यानंतर कनेरीची फुले, आणि बेल घेऊन महादेवाची पूजाकरावी.याचबरोबर प्रत्येक राशीसाठी काही खास नियम आज आम्ही सांगत आहोत. मेष- या राशीचा लोकांनी पाण्यात गुळ मिसळून त्या पाण्याने महादेवाचा अभिषेक करावा. साखर किंवा गुळाच्या पोळीचा नैवद्य बनवावा. महादेवाला लाल चंदन आणि कनेराची फुले वहावीत. त्यानंतर ॐ पशुपतये नम: या मंत्राचा जप करावा. पुढील स्लइडवर वाचा इतर राशींसाठी खास पूजा आणि मंत्र...वृषभ- या राशीच्या लोकांनी दह्याने महादेवाचा अभिषेक केल्यास केल्यास फायदा होतो. यासोबतच तांदूळ, पांढरे चंदन, आणि पाढंरे फूले महादेवाला चढवावित. शिव मंत्र - ॐ शर्वाय नम:मिथुन- या राशीच्या लोकांनी ऊसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करावा. याबरोबरच मुग आणि दुर्वा महादेवाला अर्पण कराव्यात. शिव मंत्र - ॐ विरूपाक्षाय नम:कर्क- या राशीच्या लोकांनी शुद्ध तुपाने महादेवाचे अभिषेक करावा. याचबरोबर दुध, पांढ-या ररुचकीचे फूल, आणि शंखपुष्पी महादेवाला चढवा. शिव मंत्र - ॐ महेश्वराय नम:सिंह- या राशीच्या लोकांनी गुळाने महादेवाचा अभिषेक करावा. गुळ आणि तादंळाच्या खीरीचा नवैद्य बनवावा. शिव मंत्र - ॐ अघोराय नम:कन्या- या राशीच्या व्यक्तीने ऊसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करावा.त्यानंतर भांग, दूर्वा महादेवाला अपर्ण काराव्यात. शिव मंत्र - ॐ त्र्यम्बकाय नम:तुळ -या राशीच्या लोकांनी सुगंधी तेलाने महादेवाचा अभिषेक करावा.दही, मध आणि श्रीखंड यांचा प्रसाद बनवावा.पूजेत पांढरी फूले वहावित. शिव मंत्र - ॐ ईशानाय नम:वृश्चिक- या राशीच्या लोकांनी पजांमृताने महादेवाचा अभिषेक केल्यास लवकरच लाभ होतो. सोबतच महादेवाला लाल फूले अपर्ण करावीत. शिव मंत्र - ॐ विश्वरूपिणे नम:धनु- या राशीच्या लोकांनी दुधात हळदी मिसळून त्याने महादेवाचा अभिषेक करावा.पिठी साखर आणि बेसनच्या पीठापासुन बनवलेली मिठाई नवैद्य म्हणून वापरावी.पूजेत पिवळ्या झंडूची फूले वापरावीत. शिव मंत्र - ॐ शूलपाणये नम:मकर- नारळ्याच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक केल्यास मकर राशीच्या व्यक्तींना फायदा होतो.उडदाच्या दाळीचा नवैद्य बनवा. कमळाचे नीळे फूल महादेवाला अपर्ण करा. शिव मंत्र - ॐ भैरवाय नम:कुंभ- या राशीच्या लोकांनी तिळाच्या तेलाने महादेवाचा अभिषेक करावा आणि उडदाच्या दाळीचा नवैद्य बनवावा.या उपायाने शनी दोषही नाहीसे होतात. शिव मंत्र - ॐ कपर्दिने नम:मीन- या राशीच्या लोकांनी दुधात केशर मिसळून त्याने महादेवाची पूजा करावी.दही आणि भाताचा नवैद्य बनवावा. पिवळ्या मोहरीची फूले अर्पण करावीत. शिव मंत्र - ॐ सदाशिवाय नम:
X