सोमवार (17 ऑगस्ट) श्रावण मासातील पहिला सोमवार आहे. या दिवशी महादेवाची विशेष पूजा करण्याचे महत्त्व आहे. सोमवारचा सूर्योदय फाल्गुनी नक्षत्रामध्ये होईल आणि त्यानंतर 6 वाजून 02 मिनिटांनी उत्तराफाल्गुनी नक्षत्र सुरु होईल. हे नक्षत्र दिवसभर राहील. सोमवार आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्र या स्थितीमुळे श्रीवत्स नावाचा शुभ योग जुळून येत आहे. सोमवारी दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी चंद्र रास परिवर्तन करून सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. पुढे जाणून घ्या, ही ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील....