आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही लोकांसाठी बुधवार ठरू शकतो भाग्यशाली, जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज धनलाभ करून देणारे तीन शुभ योग जुळून येत असल्यामुळे आजचा दिवस काही लोकांसाठी भाग्यशाली ठरू शकतो. या शुभ योगांचा प्रभाव सर्व राशींवर राहील.

जाणून घ्या केव्हा आणि कसे जुळून येत आहेत हे योग आणि या योगांचा कसा राहतो प्रभाव...

चर योग - बुधवारी सुर्योदयासोबत मघा नक्षत्र असल्यामुळे हा योग जुळून आला आहे. हा योग दुपारी चार वाजेपर्यंत राहील. या शुभ योगामध्ये आर्थिक काम लवकर पूर्ण होते.

स्थिर योग - हा योग दुपारी 4.00 नंतर सुरु होईल आणि दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत राहील. हा योग बुधवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामुळे तयार होत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने लक्ष्मी स्थिर राहते.

सिद्धी योग - हा योग सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे तयार होत आहे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे तयार झालेला हा योग दिवसभर राहील. या योगामध्ये पैशासंबंधी करण्यात आलेल्या कामामध्ये लाभ होतो.
(डेमो पिक)