काल रात्री जवळपास सात वाजता शनीने रास परिवर्तन केले आहे. आता शनि तूळ राशीतून वृचीक राशीत आला आहे. जवळपास अडीच वर्ष शनि याच राशीमध्ये राहील. वृश्चिक राशीमध्ये शनि आल्यामुळे सूर्य आणि शनीचा एक अशुभ योग जुळून येत आहे. सूर्य आणि शनि शत्रू ग्रह आहेत. सूर्य आणि शनीच्या स्थितीमुळे द्विर्द्वादश नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 16 नोव्हेंबरपर्यंत राहील.
या अशुभ योगाच्या प्रभावाने वाद-विवाद घडू शकतात. मानसिक तणाव आणि कोर्टाच्या कामामध्ये अडथळे या योगामुळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त आज चंद्र दिवसभर पूर्वाभाद्रपद नक्षत्रामुळे मुसळ नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. येथे जाणून घ्या, शनिसोबतच इतर ग्रहांच्या स्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
सोमवारची ग्रह स्थिती
सूर्य - तूळ राशीमध्ये
चंद्र - कुंभ राशीमध्ये, दुपारी 2 नंतर मीन राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - कन्या राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - तूळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)