शुक्रवारी तीन प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. हे वेगवेगळी शुभ योग त्रस्त, अडचणीतील लोकांसाठी आरामदायक राहील. शुक्रवारी दिवश्भर उ.भाद्रपदा नक्षत्र राहील. या नक्षत्राच्या संयोगाने ध्वज नावाचा शुभ योग जुळून येईल. हा शुभ योग जवळपास सर्व राशींसाठी कोणत्या न कोणत्या स्वरुपात लाभदायक ठरेल. या योगाच्या प्रभावाने कामामध्ये यश प्राप्त होईल.
या व्यतिरिक्त आज मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या ठीक समोरासमोर आहेत. चंद्र-मंगळ अशा स्थितीमध्ये असल्यास लक्ष्मी नावाचा शुभ योग जुळून येतो. या योगाच्या प्रभावाने सर्व राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.
शुक्रवार २० जून रोजी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आणखी एक सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या या तीन शुभ योगांचा प्रभाव तुमच्यासाठी कसा राहील...