शुक्रवारी (20 नोव्हेंबर) कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. या तिथीला आवळा नवमी साजरी केली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी 03.05 पर्यंत शतभिषा नक्षत्र राहील, त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र लागेल. शुक्रवारी शतभिषा नक्षत्राच्या योगाने सौम्य आणि पूर्वाभाद्रपद योगाने ध्वांक्ष नावाचा योग जुळून येईल. सौम्य शुभ तर ध्वांक्ष अशुभ योग आहे.
शुक्रवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र- कुंभ राशीमध्ये
मंगळ- कन्या राशीमध्ये
बुध- वृश्चिक राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कन्या राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...