आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2014 Last Pushya Yoga Today Know Why This Is Special And Measures

2014 मधील शेवटचा पुष्य योग आज : जाणून घ्या, खास उपाय आणि महत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (10 डिसेंबर, बुधवार) वर्ष 2014 मधील शेवटचा पुष्य योग आहे. बुधवारी पुष्य नक्षत्राचा योग असल्यामुळे हा बुध-पुष्य योग मानला जाईल. यानंतर 6 जानेवारी 2015 रोजी मंगळ-पुष्य योग जुळून येईल. उज्जैनचे ज्योतिषी पंडित विनय भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पुष्य नक्षत्राचा संयोग मातंग योग तयार करतो. या योगामध्ये काही खास उपाय केल्यास वंश वृद्धी आणि धन वृद्धी होते. तसेच व्यापारात लाभ होतो.

काही लोक पुष्य शब्दाला पुष्प शब्दातून उत्पन्न झाल्याचे मानतात. पुष्प शब्दाला सौंदर्य, शुभता तसेच प्रसन्नतेशी जोडले जाते. या शब्दामधुनही पुष्य नक्षत्र शुभ तसेच सुंदर असल्याचे संकेत मिळतात.

जाणून घ्या, पुष्य नक्षत्राबद्दल
प्राचीन काळापासून ज्योतिष विद्वान 27 नक्षत्राच्या आधारावर गणना करत आले आहे. यामधील प्रत्येक नक्षत्राचा शुभ-अशुभ प्रभाव मनुष्यावर पडत असतो. नक्षत्राच्या या क्रमामध्ये आठव्या स्थानावर पुष्य नक्षत्र येते. ज्योतिष शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करण्यात आलेल्या वस्तू प्रदीर्घ काळापर्यंत उपयोगात येतात तसेच शुभफळ प्रदान करतात, कारण हे स्थायी नक्षत्र आहे

नक्षत्रांचा राजा आहे पुष्य
पुष्यला नक्षत्रांचा राजा मानले जाते. हे नक्षत्र आठवड्यातील विविध वारांसोबत मिळून विशेष योग तयार करते. या सर्व योगांचे एक विशेष महत्त्व आहे. रविवार, बुधवार आणि गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र अत्याधिक शुभ असते. ऋग्वेदामध्ये या नक्षत्राला मंगलकर्ता, वृद्धीकर्ता, आनंदकर्ता व शुभ सांगण्यात आले आहे.

पुष्य नक्षत्र तसेच बुध-पुष्य योगामध्ये करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...