बुधवारी सूर्य तूळ आणि चंद्र मकर राशीत आहे. या ग्रहस्थितीमुळे धृती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाचा शुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. याच्या प्रभावाने राशीनुसार काही लोकांना आनंदाची बातमी समजू शकते. या व्यतिरिक्त इतर ग्रहांची स्थिती ठीक आहे. बुधवारी ग्रहांच्या प्रभावाने काही नोकरदार लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. बिझनेस करणारे लोक मोठे सौदे करतील आणि अडकलेला पैसाही परत मिळू शकतो.
या व्यतिरिक्त बुधवारी सूर्य तूळ राशीमध्ये राहील. सूर्य आपल्या नीच राशीत असल्यामुळे काही राशींवर याचा अशुभ प्रभाव राहील. सूर्याच्या प्रभावामुळे काही लोक आज वादामध्ये आडकू शकतात. शनि आणि सूर्याची स्थितीसुद्धा ठीक नाही. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून बाराव्या आणि दुसऱ्या राशीत असल्यामुळे द्विर्द्वादश योग तयार करत आहेत. यांच्या प्रभावाने काही लोकांना बिझनेसमध्ये अचानक नुकसान होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बुधवार तुमच्यासाठी कसा राहील...