आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 जुलै : शनि-पुष्य योगाचा प्रभाव तुमच्यावर कसा राहील, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 जुलै, शनिवारी शनि-पुष्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. शनिवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असल्यामुळे हा योग जुळून आला आहे. शनिवारी पुष्य नक्षत्राचा योग दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुरु होऊन संपूर्ण रात्रभर राहील. पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये खरेदी आणि शुभ कार्य करावेत. या योगामध्ये धनलाभ आणि फायदा होईल. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनि असून शनिवारी हा योग जुळून आल्यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. या योगामध्ये शनीच्या शांतीसाठी पूजा आणि दान केल्यास शनिदेव प्रसन्न होऊन शुभफळ प्रदान करतात.

शनिवारच्या कुंडलीनुसार कर्क राशीमध्ये गुरु आणि चंद्र एकत्र आहेत. चंद्र स्वतःच्या राशीमध्ये शुभफळ देतो. कर्क राशी गुरूची उच्च राशी असल्यामुळे गुरु शुभफळ प्रदान करेल. चंद्र आणि गुरु एकाच राशीमध्ये असल्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार होईल. ग्रहांची ही स्थिती धनलाभ करून देणारी राहील.

शनिवारचे मुहूर्त...
दुपारी 02:12 पासून 03:51 पर्यंत - लाभ
दुपारी 03:51 पासून 05:29 पर्यंत - अमृत
संध्याकाळी 07:08 पासून - रात्री 08:29 पर्यंत - लाभ
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)